आता आणखी होणार ऑनलाईन व्यवहार, OTP ची गरज पण नाही उरणार
Online Transaction OTP | सुरक्षित ऑनलाईन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन पद्धत आणण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये ओटीपीऐवजी नवीन पद्धतीचा वापर करण्यत येईल. ऑथेंटिकेशन फ्रेमवर्कवर आरबीआय काम करत आहे. काय आहे ही पद्धत, कसा होतो याचा वापर, काय होईल फायदा, जाणून घ्या...
नवी दिल्ली | 13 February 2024 : तुम्ही कोणतेही ऑनलाईन व्यवहार करता, त्यावेळी व्हेरिफिकेशनसाठी एक एसएमएस येतो. त्यात ओटीपी असतो. हा ओटीपी टाकाल की संबंधित व्यवहार पूर्ण होतो. ऑनलाईन पेमेंटमध्ये कुठली ही गडबडी होऊ नये अथवा फसवणूक टाळण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते. केंद्रीय बँक ऑथेंटिकेशन फ्रेमवर्कवर काम करत आहे. त्याआधारे ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे पूर्ण करता येईल. आरबीआयने बँकांना एसएमएस आधारीत वन-टाईण पासवर्डचा (OTP) वापर करण्यास सांगितले होते. पण आता व्यवहार त्यापेक्षा सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी नवीन योजनेवर काम करण्यात येत आहे.
काय आहे पर्याय
ओटीपीसाठी सर्वात मोठा पर्याय ऑथेंटिकेटर एप आहे. त्याासाठी युझर्सला त्यांच्या मोबाईलवर दुसऱ्या एप्लिकेशन आधारे पासवर्ड मिळवावा लागेल. सेवा पुरवठादारांनी मोबाईल एपमध्ये टोकन सारख्य सुविधा पण विकसीत केल्या आहेत. पण या सर्व प्रक्रियेसाठी एका स्मार्टफोनची गरज भासते.
ऑथेंटिकेटर एप किती सुरक्षित?
व्यवहार सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी सेवा पुरवठादार एका महिन्याला जवळपास 400 कोटी ओटीपी पाठवतात. पण तरीही स्मार्टफोन हॅक होणे अथवा इतर पद्धतीने ओटीपीचा पण गैरवापर होत असल्याचे समोर आल्यानंतर ओटीपीला पर्याय देण्यावर भर देण्यात आला आहे. या नवीन ऑथेंटिकर एपमुळे सेवा पुरवठादारांचा ग्राहकांशी थेट संपर्क राहिल. त्यामुळे विना ओटीपी टोकन आधारे व्यवहार पूर्ण करता येईल.
डीपफेकची जोखीम
पण अनेक तज्ज्ञांच्या मते ऑथेंटिकेशन हा काही एकमेव सुरक्षित पर्याय नाही. AI चा विकास झाला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. डीपफेकने नवीन जोखीम वाढवली आहे. पण आता सिम कार्ड खरेदी करताना नियम कठोर करण्यात आले आहे. त्याचा फायदा होईल. पण बनावट ई-मेल आणि हँकिंगचा धोका आहे. अशा स्थितीत आता हे नवीन तंत्रज्ञान काय कमाल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आरबीआयने ही नवीन पद्धत कधी लागू होणार याची माहिती अजून दिलेली नाही. पण याच वर्षात हे नवीन तंत्रज्ञान ओटीपीची जागा घेण्याची शक्यता आहे.