आईच्या दुधाची विक्री नाहीच, भरावा लागेल मोठा दंड; FSSAI ने दिला इशारा

FSSAI on Human Milk : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना FSSAI ने महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. मानवी दूध आणि त्याची इतर उत्पादनांवर तात्काळ रोख लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

आईच्या दुधाची विक्री नाहीच, भरावा लागेल मोठा दंड; FSSAI ने दिला इशारा
आईच्या दुधाची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 10:57 AM

मानवी दुधाच्या व्यापारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आलेली आहे. भारतात आईच्या दुधाची विक्री करणे बेकायदेशीर आहे. परंतु छुप्या पद्धतीने मानवी दुधाची विक्री होत असल्याचे समोर येत आहे. अशा प्रकारांना त्वरीत आळा घालण्याच्या सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिल्या आहेत. नियंत्रकांनी सर्व राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्यांना या सूचनांची कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांरव कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

विक्री आणि प्रक्रियावर बंदी

FSSAI ने मानवी दूध विक्री, त्यावर कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले आहेत. दूध विक्री करणाऱ्या अशा काही व्यापाऱ्यांना त्यांनी कडक करावाईचा इशारा दिला आहे. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले. काही व्यापारी आईच्या दुधाची विक्री करण्याला FSSAI ने मान्यता दिल्याची थाप मारत असल्याचे समोर आले होते.

हे सुद्धा वाचा

नवीन आदेश काय?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने 24 मे रोजी हा नवीन आदेश दिला आहे. अन्न नियत्रंक विभागाला देशभरातून या संबंधीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक सरकारी संस्थांनी पण याविषयीची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी FSSAI ची मान्यता असल्याची बतावणी केली जात आहे. त्यामुळे FSSAI ने कडक पाऊल टाकलं आहे. अन्न सुरक्षा कायदा 2006 आणि नियमांतर्गत मानवी दूधाची विक्री आणि प्रक्रियेला मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य-केंद्र शासित प्रदेशांन सूचना

  1. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील अन्न सुरक्षा आयुक्तांनी केंद्रीय संस्थेने अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मानवी दुधाची विक्री होत असल्याचे समजल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मानवी दूध आणि त्यावरील प्रक्रिया केलेले इतर पदार्थ यांची विक्री करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  2. यासंबंधीच्या अन्न सुरक्षा अधिनियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्यातंर्गत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत परवानाधारक एखादी संस्था, व्यक्ती, आईचे दूध विक्री करण्याच्या व्यवसायात असल्याचे लक्षात आल्यास त्याचा परवाना रद्द करण्याची आणि त्याला पुन्हा तो परवाना न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.