Akshaya Tritiya मुहूर्तावर केवळ 1 रुपयांत खरेदी करा 24 कॅरेट सोने, कुठे आणि कसे, घ्या जाणून

Gold Buy in One Rupees : आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करण्यास जात असाल तरी ही खास ऑफर तुमच्यासाठी 24 कॅरेट सोने तुम्हाला अवघ्या 1 रुपयांत खरेदी करता येईल. तुमचा विश्वास बसत नाही ना? मग वाचा..

Akshaya Tritiya मुहूर्तावर केवळ 1 रुपयांत खरेदी करा 24 कॅरेट सोने, कुठे आणि कसे, घ्या जाणून
सोने खरेदी करा 1 रुपयांत
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 2:24 PM

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानण्यात येते. सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71,500 रुपये इतका आहे. पण तरीही तुम्ही अवघ्या 1 रुपयांत 24 कॅरेट सोने खरेदी करु शकता. तुमचा विश्वास बसत नाही ना? इतक्या महागाईत अवघ्या एक रुपयांत कोण सोने देईल, असे वाटते ना? मग ही ऑफर पाहाच…

घरबसल्या खरेदी करा सोने

1 रुपयांचे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दागदागिन्यांच्या दुकानात जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या डिजिटल माध्यमातून सोन्याची खरेदी करता येईल. जर तुम्ही अधिक सोने खरेदी करु इच्छित असाल तर ते तुमच्या मनावर आहे. डिजिटल गोल्डची किंमत सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती इतकीच आहे. हे सोने तुम्हाला डिजिटल पद्धतीने तुमच्या वॉलेटमध्ये जमा होते. तुम्हाला वाटले तेव्हा ते खरेदी-विक्री करता येते.

हे सुद्धा वाचा

कसे खरेदी करणार डिजिटल सोने?

भारतात MMTC-PAMP India Pvt. Ltd, Augmont Gold Ltd सारख्या कंपन्या डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय देतात. याशिवाय तुम्ही गुगल पे, फोन पे या सारख्या लोकप्रिय ॲप तुमच्या मदतीला येतील. या ॲपवर सुद्धा तुम्हाला डिजिटल गोल्ड खरेदी करता येते. हे सोने तुम्हाला ऑनलाईन केव्हापण विक्री करता येते. विक्री केल्यानंतर परतावा तुमच्या खात्यात जमा होतो.

नकली सोने ओळखणार कसे?

या अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदी करण्याची योजना आखत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care App इन्स्टॉल नक्की करा. या ॲपच्या मदतीने तुम्ही ISI मार्क सोन्याचे हॉलमार्किंग, त्याची गुणवत्ता याची माहिती घेऊ शकता. गडबड वाटल्यास तक्रार नोंदवू शकता. सोन्याबाबत कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला BIS Care App इन्स्टॉल करावे लागेल. ॲप उघडून तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आदी माहिती जमा करा. ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा. आता हे ॲप तुम्ही वापरु शकता.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने स्वस्त झाले तर चांदी महागली. 24 कॅरेट सोने 71,502 रुपये, 23 कॅरेट 71,216 रुपये, 22 कॅरेट सोने 65,496 रुपये झाले. 18 कॅरेट 53,627 रुपये, 14 कॅरेट सोने 41,829 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,342 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.