Deepak Parekh : रुपयाची पण उधारी नाही, कर्ज वाटून उभं केले Empire, दीपक पारेख चर्चेत

Deepak Parekh : आयुष्यात चार आणे सुद्धा कधी कर्ज घेतले नाही. पण लोकांच्या अडीनडीला कर्ज पुरवठा करत 16 लाख कोटींचा यशस्वी व्यवसाय उभारला. कोण आहेत दीपक पारेख, का होत आहे चर्चा

Deepak Parekh : रुपयाची पण उधारी नाही, कर्ज वाटून उभं केले Empire, दीपक पारेख चर्चेत
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 6:27 PM

नवी दिल्ली : आयुष्यात कधी रुपयाचे सुद्धा कर्ज घेतले नाही. पण लोकांच्या अडीनडीत कर्ज वाटप (Loan) करुन त्यांनी भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक यश मिळवले. 16 लाख कोटींचा यशस्वी व्यवसाय उभारणारे दीपक पारेख (Deepak Parekh) यांच्या नावाची सध्या खूप चर्चा आहे. इतका मोठा व्यवसाय उभारुन सुद्धा त्यांनी कंपनीकडून कधीच मोठी अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी या कंपनीत 1 टक्क्यांहून अधिकची हिस्सेदारी घेतली नाही. 1977 मध्ये त्यांनी कर्ज वाटप करणारी कंपनी स्थापन केली. तेव्हापासून स्वयंशिस्तीने ती चालवूनच दाखवली नाही तर मोठे व्यावसायिक मॉडेल उभे करुन दाखवले. कर्ज रक्कमेवर ग्राहकांना त्यांचे स्वप्न साकारता आली. कोण आहेत दीपक पारेख, कोणतं एम्पायर त्यांनी उभं केलं?

कोण आहेत दीपक पारेख दीपक पारेख यांनी मुंबईतून पदवी घेतली. त्यानंतर चार्टेड अकाऊंटसी शिकण्यासाठी ते लंडन येथे गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते अर्न्स्ट एण्ड यंग या कंपनीसोबत जोडल्या गेले. त्यानंतर न्यूयॉर्कमधील त्यांनी बँकिंग क्षेत्रात उडी घेतली. चेस मॅनहॅटन सारख्या बँकेशी जोडल्या गेले. दरम्यान त्यांच्या काकांनी गृहकर्ज देणारी नवीन कंपनी सुरु केली. नोकरीनिमित्त त्यांना सऊदी अरबमध्ये पाठविण्यात येणार होते. ते नाखूश होते. त्यांनी काकाच्या कंपनीत काम करण्याचे मन निश्चित केले.

निवृत्तीची केली घोषणा दीपक पारेख हे एचडीएफसीचे चेअरमन आहेत. त्यांनी या पदावरुन 30 जून रोजी निवृत्तीची घोषणा केली. एचडीएफसी बँक, एचडीएफसी कंपनीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया 1 जून रोजी पूर्ण झाली. पारेख यांनी एचडीएफसीचे शुन्यातून साम्राज्य तयार केले. एचडीएफसीची स्थापना त्यांचे काका हंसमुख ठाकोरदास यांनी 1977 साली केली होती. त्यांनी पारेख यांना बोलावून घेतले. हा निर्णय ऐतिहासीक ठरला.

हे सुद्धा वाचा

कर्जाचे मार्केट बदलले पारेख यांनी आयुष्यात कधी 1 रुपयांचे कर्ज घेतले नाही. त्यांनी पूर्वीपासूनच आर्थिक शिस्त लावून घेतली होती. ते कधी पैशांच्या मागे पण धावले नाही. अनेक संधी येऊनही त्यांनी एचडीएफसी सोडली नाही. तसेच एचडीएफसीत त्यांनी मोठी हिस्सेदारी पण मागितली नाही. ज्याकाळी कर्ज घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण नव्हते. कर्ज घेणे हे वाईट असल्याची भावना होती. त्याकाळी त्यांनी कर्ज देण्याचा व्यवसाय सुरु केला होता.

सामान्य बाब त्याकाळी देशात उद्योग व्यवसाय भरभराटीला येत होता. अनेक शहरे वाढत होती. लोकांना पगार मिळत असला तरी घर बांधणे, कार घेणे, इतर खर्चासाठी मोठी रक्कम मिळणे दुरापास्त होते. अशावेळी त्यांनी कर्ज वाटप सुरु केले. सुरुवातीला ही गोष्ट समाजाच्या पचनी पडली नाही. पण पारेख यांच्या कौशल्याने पुढे देशात कर्ज वाटप आणि कर्ज घेणे ही सामान्य बाब ठरली. पुढे ते एक एक पायरी चढत एचडीएफसीचे चेअरमन झाले. अनेक चढउतार आले. स्पर्धक आले. सवलती, आमिष यामुळे बाजारात स्पर्धा तीव्र झाली.

किती पगार मनीकंट्रोलनुसार, पारेख 1978 मध्ये एचडीएफसीत रुजू झाले. त्यावेळी त्यांचा पगार 3500 रुपये, 500 रुपये महागाई भत्ता, 15 टक्के घरभाडे आणि इतर सुविधा देण्यात आल्या. त्यांचा सध्याचा पगार हा 2,47,00,000 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.