Jet Airways नव्हे तर या विमान कंपन्यांचेही दिवाळे निघाले..पाहा कोणत्या कंपन्या

सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेज कंपनीच्या लिक्विडेशनला मंजूरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात जेट एअरवेज इतिहासात जमा होणार आहे.परंतू या आधी देशातील दहा विमान कंपन्याना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या...

Jet Airways नव्हे तर या विमान कंपन्यांचेही दिवाळे निघाले..पाहा कोणत्या कंपन्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 9:04 PM

देशाची सर्वात मोठी खाजगी एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज आता इतिहास बनली आहे. अनेक काळापासून ही कंपनी बंद पडलेली आहे. तिला पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न देखील वाया गेले आहेत. जेट एअरवेज कंपनीचे लिक्वीडेशन करुन ( संपत्ती विक्री ) कर्ज फेडावे आणि कंपनीला कायमचे बंद करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. या आधीही देशातील दहा एअरलाईन्स कंपन्या देखील बंद पडल्याने त्यांना हा दिवस पाहावा लागला आहे. कोणत्या या कंपन्या आहेत ते पाहूयात.

अलिकडे स्वस्तातील एअरलाईन्स कंपनी गो फर्स्टने देखील स्वत:ला दिवाळखोर घोषीत केले आहे. ही कंपनी देखील अखेरची घटका मोजत आहे. त्याआधी भारतातून पसार झालेले विजय मल्ल्या यांची किंगर फिशर एअरलाईन्स देखील बंद झाली होती. तसेच आताच्या घडील स्पाईस जेट देखील संकटाचा सामना करीत आहे. आणखी कोणत्या विमान कंपन्या बंद पडल्या ते पाहूयात.

‘वायुदूत’ से ‘सहारा’ कंपन्यांचे दिवाळे निघाले

भारतात 1981 मध्ये ‘वायदूत’ नावाची एक प्रादेशिक एअरलाईन्स कंपनी सुरु झाली होती. या कंपनीला त्यावेळी चलतीत असलेल्या एअर इंडिया आणि इंडियन एयरलाइंस या कंपन्यांनी सुरु केले होते. ही कंपनी देशाच्या उत्तर – पूर्व परिसरात सेवा देत होती. परंतू साल 1997 मध्ये ही एअरलाईन्स कंपनी अखेर बंद झाली.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर उदारीकरणाची प्रक्रीया सुरु झालेय त्यावेळी सहारा इंडिया परिवाराने पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सेवा देणारी सहारा एअरलाइन्स कंपनी साल 1993 मध्ये सुरु केली. साल 2000 मध्ये या कंपनीला एअर सहारा नावाने रि-ब्रॅंडींग केले गेले. त्यावेळी देशातील एक मोठी कंपनी म्हणून ती ओळखली जात होती. साल 2006 मध्ये पोहचतानाही कंपनी गंटागळ्या खाऊ लागली आणि साल 2007 मध्ये सहारा ग्रुपने या कंपनीला जेट एअरवेजला विकले. आज जेटएअरवेज स्वत:च बंद होत असून साल 2019 पासून तिची उड्डाणे बंद आहेत.

East-West एअरलाईन्स पहिली खाजगी विमान कंपनी

सहारा एअर लाईन्स कंपनीच्या आधी साल 1992 मध्ये देशाची पहिली खाजगी एअरलाई्न्स कंपनी म्हणून ईस्ट-वेस्ट कंपनी सुरु झाली. सुरुवातीला ही कंपनी केवळ प्रायव्हेट चार्टर प्लेन चालवायची. परंतू साल 1994 मध्ये हिला शेड्युल एअरलाईन्स स्टेटस मिळाले. याच्या एक वर्षांनंतरच 1995 मध्ये कंपनीचे अध्यक्ष तकीयुद्दीन वाहिद यांची गोळ्या घालून हत्या झाली. आणि मोठ्या प्रमाणावर कर्ज झाल्याने ही कंपनी बंद पडली.

ModiLuft एअरलाईन्स

स्पाईस जेट विमान कंपनीचे आधीचे मूळ नाव ModiLuft एअरलाईन्स होते. जिची मालमत्ता विकत घेऊन साल 2004 मध्ये स्पाईस जेट सुरु झाली होती. या कंपनीला जर्मनीची एअरलाईन्स लुफ्थांसा आणि भारताचे उद्योगपती एस.के. मोदी यांनी साल 1993 मध्ये सुरु केले होते. केवळ तीन वर्षांत म्हणजे साल 1996 मध्ये ही एअरलाईन्स बंद झाली.

देशातील अनेक एअरलाईन्स कंपन्या आतापर्यंत बंद झालेल्या आहेत. परवेज दमानिया आणि विस्पी दमानिया बंधूंनी साल 1993 मध्ये सुरु केलेल्या दमानिया एअरलाईन्स साल 1997 मध्ये बंद झाली होती. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची किंगफिशर एअरलाईन्सचे ऑपरेशन साल 2012 मध्ये बंद झाले. काही वर्षांपूर्वी साल 2015 मध्ये पेगासस नावाची एक प्रादेशिक एअरलाईन्स कंपनी सुरु झाली तरी एक वर्षांनंतर साल 2016 मध्ये ठप्प झाली.

दिल्ली येथील प्रादेशिक एअरलाईन्स कंपनी अर्चना एअरवेज साल 1993 ते 2000 पर्यंत चालली. साल 2005ते 2010 दरम्यान Paramount Airways नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. आता या वाटेवर विस्तारा आणि एअर एशिया इंडिआ नावाच्या कंपन्या देखील आहेत. कारण टाटा ग्रुपने एअर इंडीया विकत घेतल्यानंतर त्यात विस्ताराचा आणि एअर एशिया इंडीयाचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरण केले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.