Tata Company : शिरपेचात खोवला मानाचा तुरा! टाटाचा थाटच न्यारा

Tata Company : आम्ही देशाचं मीठ खाल्लंय असं टाटा उगीच म्हणत नाही, रिलायन्स, अदानींना मागे टाकत टाटाने जगातील टॉप कंपन्यांमध्ये अशी मारली बाजी...

Tata Company : शिरपेचात खोवला मानाचा तुरा! टाटाचा थाटच न्यारा
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 5:33 PM

नवी दिल्ली : आम्ही देशाचं मीठ खाल्लंय असं टाटा उगीच म्हणत नाही, रिलायन्स, अदानींना मागे टाकत टाटाने (Tata Group) जगातील टॉप कंपन्यांमध्ये बाजी मारली आहे. टाचणीपासून ते विमानपर्यंत टाटा सर्वच काही तयार करतात, असे दिमाखात म्हटले जाते. टाटा समूहाने देशासाठी मोठं योगदान दिले आहे. आरोग्यचं नाही तर संकटाच्या काळात पण टाटाने देशाला मोठी मदत केली आहे. त्यामुळेच टाटा समूहाविषयी देशातील प्रत्येक व्यक्तीला आदर वाटतो. आतापर्यंत अनेकदा ही कंपनी अनेक कसोट्यांवर खरी उतरली आहे. आता या कंपनीने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

इतर कंपन्या नाही स्पर्धेत देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक कुटुंबांपैकी टाटा समूहाने एक मोठा पल्ला गाठला आहे.जगातील नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये टाटा समूहाने झेंडा रोवला. जगातील 50 नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये टाटा समूह 20 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही भारतीय कंपनीला हा सन्मान मिळालेला नाही. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या वतीने मोस्ट इनोव्हेटिव कंपनी 2023 ची घोषणा करण्यात आली.

कशाच्या आधारे निवड या यादीत कंपन्यांची कामगिरी, संकटांवर मात करण्याची कंपनीची क्षमता, नाविन्यपूर्णता, नवीन कल्पनांवर काम करण्याची हतोटी या सह इतर मापदंडांवर कंपनीचा पडताळा करण्यात येतो. टाटा समूहाने 2045 पर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणती कंपनी अग्रेसर या यादीत आयफोन तयार करणारी अमेरिकन कंपनी ॲप्पल या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर एलॉन मस्क (Elon Musk) यांची इलेक्ट्रिक कार टेस्ला दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्ला या यादीत गेल्यावेळी तिसऱ्या स्थानावर होती. अमेरिकेतील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon) या यादीत तिसऱ्या स्थानी तर गूगल (Google) ची मूळ कंपनी अल्फाबेट (Alphabet) आहे. अमेरिकेतील फार्मा कंपनी मॉडर्ना (Moderna), दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung), चीनची हुआवे (Huawei) आणि बीवायडी कंपनी (BYD Company), सिमन्स (Siemens) यांचा क्रमांक लागतो. टॉप- 10 मध्ये अमेरिकाच्या सहा तर चीनच्या दोन कंपन्या आहेत. मेटा (फेसबुक) या यादीत 16 व्या क्रमांकावर आहे.

टाटा कंझ्युमर नफ्यात टाटा समूह मीठापासून ते विमान सेवेपर्यंत अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. अनेक जागतिक ब्रँड या समूहाने पंखाखाली घेतले आहे. या समूहाने मोठा विस्तार केला आहे. प्रत्येक प्रांतात, क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा खास प्रयत्न टाटा समूह करतो. टाटा समूह चहा, कॉपी आणि मीठाच्या उत्पादनातून कोट्यवधींची कमाई करत आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने कंपनीचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला 268 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षात याच तिमाहीत कंपनीला 217 कोटींचे नुकसान झाले होते. त्यातुलनेत आता 23 अधिक नफा झाला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.