आता पॅन कार्ड सांगेल इनकम टॅक्स नोटीस येणार का नाही…..
मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये जर तुम्ही टॅक्स इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा नसेल केला, तर 31 मार्चपर्यंत तो जमा करावा लागेल. जर असं नाही केलं, तर तुमचा टॅक्स कट होऊ शकतो. तसेच गेल्यावर्षीचा टॅक्स ज्यांनी भरला नसेल, तर त्यांचाही टॅक्स कट होण्याची शक्यता आहे. अशांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. आयकर विभागाकडून नोटीस येऊ नये […]
मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये जर तुम्ही टॅक्स इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा नसेल केला, तर 31 मार्चपर्यंत तो जमा करावा लागेल. जर असं नाही केलं, तर तुमचा टॅक्स कट होऊ शकतो. तसेच गेल्यावर्षीचा टॅक्स ज्यांनी भरला नसेल, तर त्यांचाही टॅक्स कट होण्याची शक्यता आहे. अशांवर आयकर विभागाची करडी नजर आहे.
आयकर विभागाकडून नोटीस येऊ नये यासाठी प्रत्येकजण टॅक्स वेळेवर भरण्याचा प्रयत्न करतो. मात्र तुम्हाला नोटीस येऊ शकते का? याची माहिती कशी मिळेल. यासाठी तुमच्याकडे परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड असणं गरजेचे आहे. या परमनंट अकाऊंट नंबरद्वारे आपल्याला नोटीस येणार का? याची माहिती मिळू शकते.
पॅन कार्डमुळे टॅक्स प्रोफाईलची माहिती मिळते.
तुमचे पॅनकार्ड तुमची टॅक्स प्रोफाईलची माहिती देते. केंद्र सरकारसुद्धा तुमच्या पॅन नंबरने काही मिनिंटात तुमची टॅक्स प्रोफाईलची माहिती चेक करु शकते. जर तुम्ही टॅक्स भरला नसेल, तर तुमची चौकशी केली जाते. तुमचा पगार किती आहे आणि तुम्ही टॅक्स चोरी करत नाही ना यावर लक्ष ठेवलं जाते.
कशी चेक कराल नोटिस?
आयकर विभागाची वेबसाईट https://www.incometaxindia.gov.in वर तुम्ही टॅक्सची नोटीस पाहू शकता. जर तुम्ही टॅक्स भरला आहे. मात्र तो प्रोसेसमध्ये असेल, तर तुम्हाला आयकर विभागाकडून नक्कीच नोटीस येऊ शकते. वेबसाईटसाठी तुम्हाला लॉगईनआयडी आणि पासवर्डची गरज लागेल. जर तुमच्याकडे आयडी नेसल, तर तुम्हाला रजिस्टर करावे लागेल.
तुमचा टीडीएस कसा चेक कराल?
तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म 26 AS पाहू शकता. या फॉर्ममध्ये पगारानुसार किती टीडीएस कट होतो याची माहिती दिलेली असेल. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की, किती टीडीएस तुमचा कट करण्यात आलेला आहे आणि अजून किती टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे.