नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेट जगतात अनेक विक्रम नावावर नोंदवले आहे. तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. क्रिकेट विश्वातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याने अनेक कामात स्वतःला झोकून दिले आहे. त्याने काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील एक कंपनी आता बाजारात IPO घेऊन येत आहे. पुढील आठवड्यात बुधवारी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल. 20 डिसेंबर रोजी हा आयपीओ उघडेल. सचिन तेंडुलकर याने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ही कमाईची संधी मिळेल. मग शेअर बाजाराच्या मैदानावर तुम्ही दमदार कामगिरी बजावणार की नाही?
या कंपनीचा आयपीओ बाजारात
एअरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, इंधन आणि नैसर्गिक वायू यासह इतर अनेक सेक्टर्समध्ये आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड काम करते. ही कंपनी तेलंगाणाची आहे. या कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. या आयपीओत 22 दिसंबर 2023 रोजीपर्यंत बोली लावता येईल. एंकर गुंतवणूकदार या आयपीओत एक दिवस अगोदरच 19 डिसेंबरपर्यंत बोली लावतील.
काय करते ही कंपनी
आझाद इंजिनिअरिंग ही खास क्षेत्रात काम करते. ही विमानासाठी टर्बाइन आणि पार्ट्स तयार करते. सध्या ही कंपनी एअरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा, इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात काम करते. ही जगभरात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यफॅक्चरर्सचा (OME) पुरवठा करते. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी जनरल इलेक्ट्रिक जीई (GE), हनीवेल इंटरनॅशनल, जपानची मित्सुबिशी हॅवी इंडस्ट्रीज, बहुराष्ट्रीय कंपनी सिमेन्स एनर्जी, ईटन एअरोस्पेस, मॅन एनर्जी सोल्यूशन्स यासारख्या कंपन्या, आझाद इंजिनिअरिंगच्या ग्राहक आहेत.
काय आहे प्राईस ब्रँड
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 740 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. यामध्ये 240 कोटी रुपयांपर्यंत फ्रेश शेअर इश्यू करण्यात येईल. यासह कंपनी एक प्रमोटर आणि इतर शेअरधारकांच्या बळावर 500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत आणेल. दोन रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या या शेअरची प्राईस ब्रँड 499-524 रुपयांदरम्यान आहे. आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओची लॉट साईज 28 इक्विटी शेअर आणि त्यानंतर 28 इक्विटी शेअरच्या पटीत मिळतील.
इतके शेअर राखीव
आझाद इंजिनिअरिंग आयपीओने योग्य संस्थागत खरेदीदारांसाठी (QIB) 50 टक्के शेअर, गैर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी (NII) कमीत कमी 15 टक्के आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर राखीव ठेवले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एकूण 4 कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर राखीव ठेवले आहे.