Bank Nationalization : बँकिंग इतिहासातील सर्जिकल स्ट्राईक! खासगी बँकांचे एका झटक्यात राष्ट्रीयकरण

Bank Nationalization : 19 जुलै 1969, बँकिंग इतिहासालाच कलाटणी देणारा दिवस, आता सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबविण्यात येते आहे. त्यावेळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. हा मोठा धाडसी निर्णय होता. इतिहासाच्या पानावरील या सुवर्ण दिनाने भारत घडविण्यात काय मदत केली बरं..

Bank Nationalization : बँकिंग इतिहासातील सर्जिकल स्ट्राईक! खासगी बँकांचे एका झटक्यात राष्ट्रीयकरण
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 8:59 AM

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : आज 19 जुलै, आजच्या दिवशी 53 वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) इतिहास घडला. इतिहासालाच कलाटणी मिळाली. 19 जुलै 1969 रोजी देसातील 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण (Bank Nationalization) करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी हा धाडसी निर्णय घेतला. त्याकाळात भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा खासगी बँकांचा अर्थव्यवस्थेवर दबदबा होता. अनेक बँका स्वातंत्र्यपूर्व काळातील होती. या बँकांचे व्यवस्थापन खासगी व्यक्तींच्या हाती होते. औद्योगिक घराण्यातील कुटुंबांची जणू या बँका खासगी मालमत्ता होत्या. भारतीय अर्थव्यवस्थेच्या नाड्या सरकारच्या नाही तर खासगी व्यक्तींच्या हाती असणे हे धोक्याचे असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत होते. बँकिंग क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्याचे धाडस तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या सरकारने दाखवले होते. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (PM Narendra Modi) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे.

मक्तेदारी मोडीत

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक बँका औद्योगिक घराण्यांनी स्थापन केल्या होत्या. त्यावर खासगी व्यक्तींची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी एका झटक्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्याच दिवशी मोडीत काढली होती. बँकांच्या राष्ट्रीयकरण हे भारताची आर्थिक अखंडता, सार्वभौमत्व याचे रक्षण करण्यासाठी त्यावेळी महत्वाचे होते. त्यावेळी एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर 1980 साली दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. 7 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

या बँकांचे झाले होते राष्ट्रीयकरण

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, देना बँक, यूको बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांवर ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती.

1980 मध्ये पुन्हा राबविले धोरण

19 जुलै 1969 नंतर 1980 साली सात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. 1980 मध्ये सात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आंध्रा बँका, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, पंजाब आणि सिंध बँक, विजया बँक या त्या सात बँका होत्या.

2017 मध्ये ऐतिहासिक निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने 2017 मध्ये सरकारी बँकांना बळ देण्यासाठी त्यांच्या विलिनीकरणाची तयारी केली. ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इतर पाच उप बँकांचा समावेश करण्यात आला. यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटिलाया आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्यात आले.

बँकिंग क्षेत्रात पुन्हा विलिनीकरणाचे गारुड

2019 साली मोदी सरकारने जवळपास 10 राष्ट्रीयकृत बँकांचे एकमेकांमध्ये विलिनीकरण केले. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन करण्यात आल्या. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विसर्जन करण्यात आले. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत तर देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोद्यात विलिनीकरण करण्यात आले.

आता खासगीकरणाची लाट

मोदी सरकारने काही सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्याला बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या संघटना यांनी कडाडून विरोध केला आहे. पण केंद्र सरकार या मुद्यावर अडून बसली आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. खासगी बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून सुरु झालेला हा प्रवास आता राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणापर्यंत येऊन ठेपला आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.