Demat | गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! डीमॅट खाते राहणार एकदम सुरक्षित, लवकरच मिळणार ही सुरक्षा

Demat | आता गुंतवणूकदारांना अजून एक मोठी संधी मिळणार आहे. त्यांच्या डीमॅट खात्याचतील गडबडीला अटकाव घालता येईल. त्यांना लवकरच बाजार नियंत्रक सेबी मोठी सुविधा उपलब्ध करुन देत आहे. गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यात काही घोळ होत असल्याचे लक्षात आले तर त्याला खाते ब्लॉक करण्याची संधी मिळणार आहे.

Demat | गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! डीमॅट खाते राहणार एकदम सुरक्षित, लवकरच मिळणार ही सुरक्षा
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 3:14 PM

नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : गुंतवणूकदारांसाठी एक आनंदवार्ता आली आहे. डेबिट-क्रेडिट कार्डसारखीच एक सुविधा त्यांना मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जर एखादी गडबड होत असल्याची शंका आल्यास त्यांना ट्रेडिंग खाते बंद करता येईल. त्यासाठी बाजार नियंत्रक सेबीने तयारी सुरु केली आहे. खात्यात काही गडबड वाटल्यास, त्याची दखल घेत गुंतवणूकदार त्यांचे खाते काही काळासाठी बंद करु शकतील. ही सुविधा मिळाल्यानंतर ट्रेडिंग अकाऊंट ब्लॉक करणे सोपे होईल. सध्या गुंतवणूकदारांना लॉगिन आयडी, फोन पिन या आधारे खाते उघडावे लागते. आता त्यात ही एक आणखी सुविधा मिळत आहे.

या तारखेपासून मिळेल सुविधा

सेबीने ट्रेडिंग अकाऊंट ब्लॉक करण्याच्या सुविधेविषयी 12 जानेवारी रोजी एक परिपत्रक काढले आहे. परिपत्रकात सेबीने सर्व ब्रोकरेजसह बाजाराला याविषयीचे निर्देश दिले आहेत. ट्रेडिंग अकाऊंट ब्लॉक करण्याची सुविधा 1 जुलै 2024 रोजीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. सेबीने स्टॉक एक्सचेंजला या नियमाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

डेबिट-क्रेडिट कार्डसारखीच मिळेल ब्लॉकची सुविधा

सेबीला अशात डीमॅट खात्यातील गडबडीविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना ट्रेडिंग अकाऊंट ब्लॉक करण्याची सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेनंतर गुंतवणूकदार ट्रेडिंग अकाऊंट लागलीच एकदम सोप्या पद्धतीने ब्लॉक करु शकतील. क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड हरवल्यावर अथवा चोरी गेल्यावर जसे लागलीच ब्लॉक करता येते. तशीच ही सुविधा असेल.

लवकरच चित्र होणार स्पष्ट

याविषयीचे धोरण आखण्यात येत आहे. एकदा फ्रेमवर्क ठरल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. गुंतवणूकदारांना त्यांचे ट्रेडिंग खाते बंद करण्याची विनंती पाठवता येईल. हे खाते ब्लॉक अथवा फ्रीज करण्याची विनंती करता येईल. तसेच खाते अनब्लॉक करता येईल. तसेच ते पुन्हा सक्रिय करण्याची विनंती करता येईल. आता ही सुविधा मोबाईलवरील ओटीपी आधारे द्यायची की इतर सुविधा उपलब्ध करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढली

शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. बाजारात डीमॅट खाते/ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. बाजारात पुन्हा सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. बाजारातील तेजीचे सत्र त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. तेजीचा फायदा घेण्यासाठी अनेक गुंतवणूकदार बाजाराकडे वळत आहेत. आकड्यानुसार, डीमॅट खातेदारांची संख्या 13 कोटींपेक्षा अधिक आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.