NPS Vatsalya : मुलांच्या वृद्धापकाळाची आताच करा की व्यवस्था; ही योजना संपवणार सर्व चिंता, पहिल्याच दिवशी देशभरात इतक्या हजार पालकांनी दाखवली ‘हुशारी’

NPS Vatsalya Scheme : आपल्याकडे मुलांच्या शिक्षणाची, करियरची काळजी करण्यात येते. आता पालकांना मुलांच्या म्हतारपणाची पण काळजी घेता येईल. मुलांचे भविष्य सुरक्षित करणारी एनपीएस वात्सल्य योजनेला पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मग तुम्ही मागे का राहता?

NPS Vatsalya : मुलांच्या वृद्धापकाळाची आताच करा की व्यवस्था; ही योजना संपवणार सर्व चिंता, पहिल्याच दिवशी देशभरात इतक्या हजार पालकांनी दाखवली 'हुशारी'
एनपीएस वात्सल्य योजनेचा फयादा काय
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 11:05 AM

NPS Vatsalya Scheme ला देशभरातून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. मुलांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या या योजनेविषयी पालकांमध्ये उत्सुकता दिसून आली. या योजनेत पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिसून आला. 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. आई-वडील जर मुलांच्या नावे लवकर या योजनेत गुंतवणूक करतील तर त्यांना कम्पाऊंडिंगाचा जोरदार फायदा होईल. या योजनेचे PFRDA व्यवस्थापन करत आहे. या योजनेची घोषणा 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

NPS Vatsalya योजनेला जोरदार प्रतिसाद

PFRDA ने या योजनेला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती दिली आहे. NPS Vatsalya योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत पहिल्याच दिवशी 9705 मुलांच्या नावे खाते उघडण्यात आले. यातील 2197 खाते ई-एनपीएस पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत लहान मुलांची नाव नोंदणी करण्यात आली. PRAN Cards देण्यात आले. परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर त्यांना देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक

एनपीएस वात्सल्य योजना हे सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेत मुलांच्या भविष्याची चिंता असू नये यासाठी आतापासूनच गुंतवणूक करता येते. म्हणजे मूल तरुण होताच त्याच्या निवृत्ती काळाची व्यवस्था होते. त्याला व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होतो.

2000 रुपयांच्या SIP मध्ये 2.4 कोटींचा निधी

समजा तुमचे वय 30 वर्ष आहे. या योजनेत दरमहा तुम्ही 2000 रुपयांची SIP सुरु केली. त्यावर तुम्हाला सरासरी 12% परतावा मिळाला. तर निवृत्तीवेळी ही रक्कम 70 लाख इतकी होईल. जर तुम्ही 25 व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली तर 2000 रुपयांच्या SIP मधून तुम्हाला निवृत्तीवेळी 1.3 कोटी रुपये मिळतील. तर 20 व्या वर्षात गुंतवणूक केली तर ही रक्कम 2.37 कोटी रुपये होईल.

 NPS Vatsalya योजनेसाठी कसा करणार अर्ज

आई-वडील बँक, टपाल खाते, पेन्शन फंड वा ई-एनपीएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत सहभागी होऊ शकतो. ICICI Bank ने मुंबईतील सेवा केंद्रावर या योजनेची सुरुवात केली आहे. नवीन खात्यांची नोंद केली आणि तरुण ग्राहकांसाठी प्रतिकात्मक PRAN कार्ड दिले. ई-एनपीएस पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.