Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NPS : निवृत्तीनंतर पेंशनसाठी ‘एनपीएस’ आहे उत्तम पर्याय;  जाणून घ्या योजनेतील ऑटो, अ‍ॅक्टिव्ह पर्यायांबाबत

ऑटो किंवा अ‍ॅक्टिव्ह या पर्यायाबाबत तुमचा गोंधळ असल्यास ऑटो पर्याय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या पर्यायात गुंतवणूकदाराच्या वयानुसार जोखिम घेऊन गुंतवणूक करण्यात येते.

NPS : निवृत्तीनंतर पेंशनसाठी 'एनपीएस' आहे उत्तम पर्याय;  जाणून घ्या योजनेतील ऑटो, अ‍ॅक्टिव्ह पर्यायांबाबत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 2:10 AM

पुणे : पुण्यातील राजेश पाटील व्यवसायिक आहेत. राजेशचं वय 35 वर्ष झालंय तरीही अद्याप त्यांनी निवृत्तीचं नियोजन केलं नाही. निवृत्तीनंतर पेंशन मिळवण्यााठी त्यांच्या एका मित्रानं एनपीएस (NPS) मध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा सल्ला दिला. राजेशनं ऑनलाईन गुंतवणूक सुरू करण्यास सुरुवात केली तर ऑटो आणि अ‍ॅक्टिव्ह (Active) असे दोन पर्याय समोर आले. मात्र,या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय फायदेशीर आहे याची राजेशला माहिती नव्हती. राजेशप्रमाणेच बऱ्याच लोकांना NPS काय आहे? आणि त्याचं काम कसं चालतं? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उपयोगी आहे? याची माहिती नसते. 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएसची सुरुवात करण्यात आली. 2009 नंतर NPS योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 वर्षानंतर जमा झालेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढता येते. बाकीची रक्कम तुम्हाला दर महिन्याला पेन्शन च्या रुपात मिळते.

गुंतवणुकीचे व्यवस्थापन

एनपीएसमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम फंड व्यवस्थापक इक्विटी म्हणजेच शेअर बाजारात, कार्पोरेट बॉण्ड, सरकारी रोख्यात गुंतवणूक केली जाते. आपल्या गुंतवणुकीपैकी किती टक्के हिस्सा ? इक्विटी आणि डेटमध्ये ठेवायचा आहे यासाठी ऑटो आणि अ‍ॅक्टिव्ह असे दोन पर्याय उपलब्ध असतात. मात्र, राजेशसारख्या सामान्य गुंतवणूकदारांना कोणता पर्याय निवडावा ? हे समजणं अवघडं असतं. तुम्हालाही यासंदर्भात माहिती नसेल तर ऑटो आणि अ‍ॅक्टिव्ह पर्याय कसे काम करतात हे जाणून घेऊयात.

ऑटो पर्याय

ऑटो पर्यायामध्ये एनपीएस फंड व्यवस्थापक स्वत: गुंतवणुकीबाबत निर्णय घेत असतो. ऑटो पर्यायात NPS मध्ये तीन फंड आहेत. त्यातील पहिला आहे डिफाल्‍ट मॉडरेट लाईफ सायकल फंड. या फंडात खातेधारक जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतो. दुसरा आहे कंझरव्हेटिव लाईफ सायकल फंड. या फंडात इक्विटीमध्ये 25 टक्के रक्कम गुंतवणुकीला परवानगी देण्यात येते. तर तिसरा फंड आहे अॅग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. या फंडात 75 टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये करता येते.

हे सुद्धा वाचा

अ‍ॅक्टिव्ह पर्याय

या पर्यायांतर्गत गुंतवणूकदार किती रक्कम, कुठं गुंतवणूक करायची? याबाबत निर्णय घेतो. जर तुम्ही इक्विटीचा पर्याय निवडल्यास मग गुंतवणुकीचं वाटप इक्विटी, बॉण्ड किंवा इतर पर्यायामध्ये करू शकता. इक्विटी पर्यायात 75 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. या पर्यायात फंड व्यवस्थापक तुम्हाला गुंतवणुकीच्या योजनांबद्दल माहिती देतो. तुम्ही तुमच्या जोखिमेनुसार योग्य योजनेची निवड करू शकता.

कोणता पर्याय योग्य?

ऑटो किंवा अ‍ॅक्टिव्ह या पर्यायाबाबत तुमचा गोंधळ असल्यास ऑटो पर्याय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या पर्यायात गुंतवणूकदाराच्या वयानुसार जोखिम घेऊन गुंतवणूक करण्यात येते. काही दिवसानंतर बाजाराची ओळख झाल्यानंतर तुम्ही अ‍ॅक्टिव्ह पर्यायाची निवड करून स्वत: पोर्टफोलिओचं व्यवस्थापन करू शकता, असा सल्ला कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन यांनी दिलाय. ज्या गुंतवणुकदारांना इक्विटी आणि डेट बाजाराची माहिती आहे तसेच ते बाजाराच्या चढ उतारावर लक्ष ठेवतात त्यांच्यासाठी अ‍ॅक्टिव्ह पर्याय उत्तम ठरू शकतो.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.