घडला असा पण इतिहास! पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा NSE ने लावले चार चांद

NSE Pakistan Economy | RBI ने पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय येताच शेअर बाजाराला ताकद मिळाली. जोरदार तेजीचे सत्र आले. NSE ने नवीन उच्चांक गाठला. पण या उच्चांकासोबतच एनएसईने अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थतज्ज्ञांना धक्का बसला आहे.

घडला असा पण इतिहास! पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा NSE ने लावले चार चांद
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 2:50 PM

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : गुरुवारच्या पडझडीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा तेजीचे सत्र आले. 8 डिसेंबर रोजी सकाळी भारतीय रिझर्व्हब बँकेने देशभरातील ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता आणली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय येताच बाजाराचा मूड बदलला. बाजारात तेजीचे सत्र आले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही त्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ आशिष चौहान यांच्या वक्तव्याने तर गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. 2047 पर्यंत भारतीय स्टॉक मार्केटचे भांडवल जवळपास 50 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याचा दावा त्यांनी केला. या उच्चांकासोबतच NSE ने अजून एक रेकॉर्ड नावावर केला. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थतज्ज्ञांनाच नाही तर राज्यकर्त्यांना पण धक्का बसला.

पाकिस्तानपेक्षा NSE चे मार्केट कॅप अधिक

आशिष चौहान यांच्या मते, देश जेव्हा स्वातंत्र्याचे 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा शेअर बाजार मोठी गोळाबेरीज करेल. सध्या भारताचा शेअर बाजार जवळपास 4 लाख कोटी डॉलरच्या भांडवलसह व्यापार करत आहे. या दरवाढीचा विचार करता, एनएसई, भांडवलाच्या जोरावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. एनएसई भांडवल्या दृष्टीने जगातील 20 वा देश ठरु शकतो. क्रय शक्ती समानतेच्या (PPP) दृष्टीने पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगातील 25 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांची संख्या वाढली

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 8.35 कोटींच्या जवळपास आहे. यातील 17% कुटुंब NSE चे व्यवसायिक सदस्यत्वाच्या राष्ट्रीय नेटवर्कच्या माध्यमातून शेअर बाजारात थेट गुंतवणूक करत आहे. शेअर बाजाराची कामगिरी सध्या जोरावर आहे. अनेक बदल आणि गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात बाजाराला यश आले आहे. त्यामुळेच बाजार मजबूत होत आहे. अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये भारताचा क्रमांक लागतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.