दोन बड्या सरकारी बँकांचा IFSC कोड बदलला, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

आता या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन आयएफएससी आणि युजर आयडी मिळणार आहेत. (OBC and UNI Bank IFSC Code Change)

दोन बड्या सरकारी बँकांचा IFSC कोड बदलला, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
IFSC Code Change
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 2:36 PM

मुंबई : जर तुमचे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UNI) खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2021 पासून ओबीसी आणि यूएनआयचा आयएफएससी कोड बंद होणार आहे. तसेच ग्राहकांचे यूजर आयडीही बदलले आहे. या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन आयएफएससी आणि युजर आयडी मिळणार आहेत. (OBC and UNI Bank IFSC Code Change)

दरम्यान ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनकरण झाले आहे. त्यामुळे जुना युजर आयडी आणि आयएफएससी कोड हा बदलण्यात येणार आहे. या दोन्हीही गोष्टी केवळ 31 मार्च 2021 पर्यंत वैध होत्या. त्यानंतर आता या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन आयएफएससी आणि युजर आयडी मिळणार आहेत.

पंजाब नॅशनल बँकेने केलेल्या एका ट्वीटनुसार, eOBC आणि eUNI ने IFSC कोड हे 1 एप्रिल 2021 ला बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन IFSC कोडसाठी संबंधित शाखा किंवा पीएनबीच्या कॉर्पोरेट वेबसाईटवर भेट द्यावी, अशी माहिती दिली आहे. ओरिएंटल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पीएनबीमध्ये विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे या दोन बँकांचे ग्राहक आता पीएनबीचे ग्राहक बनले आहेत.

असा मिळेल नवीन IFSC

ऑनलाइन व्यवहारांसाठी बँकेच्या खाते क्रमांकासह आयएफएससी कोड असणे गरजेचे असते. भारतातील बँकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सर्व बँकांच्या शाखा लक्षात ठेवणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर पीएनबीच्या ग्राहकांना मिळणार नवा आयएफएससी कोड अगदी सहज मिळणार आहे. (OBC and UNI Bank IFSC Code Change)

बँकेच्या ट्वीटमध्ये एक फॉर्म दिला आहे. हा फॉर्ममध्ये ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9264092640 वर एसएमएस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नवा IFSC कोड मिळू शकतो.  यात UPGR <Space><अकाऊंट नंबरचे शेवटचे चार अंक > लिहून 9264092640 वर एसएमएस पाठवा.

User ID मध्येही बदल

  • तुमचा नवीन User ID जाणून घेण्यासाठी ‘Know your user ID’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यासाठी eOBC ग्राहकांनी त्यांच्या 8 अंकी User ID च्या पुढे O लावावे.
  • तर eUNI ग्राहकांनी त्यांच्या 8 अंकी User ID च्या पुढे ‘U लावावे.
  • मात्र ज्यांचा युजर आयडी हा 9 अंकी आहे, त्यांना यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.

जुने चेकबुक तीन महिने वापरता येणार

पीएनबीने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूएनआय) च्या खातेधारकांच्या चेकबुकची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे या दोन्ही बँकांचे ग्राहक जूने चेकबुक हे 30 जूनपर्यंत वापरु शकतात. (OBC and UNI Bank IFSC Code Change)

संबंधित बातम्या : 

Baal Aadhaar | लहान मुलांसाठी विशेष आधारकार्ड, जाणून घ्या बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया

उन्हाळा सुरु झाला, ‘या’ व्यवसायात कमी गुंतवणुकीत मोठी कमाई करा, वाचा सविस्तर

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.