अबब.. 2,500 स्वेअर फूटांचे बेडरुम,16 प्रशस्त बाथरुम, दुबईतला 1,675 कोटींचा ‘मार्बल पॅलेस’, ही बडी असामी विकत घेतेय

| Updated on: Jun 15, 2023 | 1:08 PM

जगात ही मालमत्ता विकत घेऊ शकतात अशा पाच ते दहाच व्यक्ती आहेत. हे घर विकत घेण्यास उत्सुक असलेली व्यक्ती नक्कीच राजकारणातील असून तिला लोकांचे मनोरंजन करायला आवडते असे लक्झहॅबिटेट सॉथेबीज् च्या केरी मायकल यांचे म्हणणे आहे.

अबब.. 2,500 स्वेअर फूटांचे बेडरुम,16 प्रशस्त बाथरुम, दुबईतला 1,675 कोटींचा मार्बल पॅलेस, ही बडी असामी विकत घेतेय
emirates-hills-09-1
Follow us on

दुबई : दुबईत आता हॉलीवूडच्या ब्रेव्हरी हील्सच्या ( Beverly Hills ) धर्तीवर एमिरेट्स हील्स ( Emirates Hills ) उभारली गेली आहे. या एमिरेट्स हील्सवर एक मोठी प्रॉपर्टी विकण्यास काढण्यात आली आहे. जवळ साठ हजार स्वेअर फूट क्षेत्रफळ असलेला ही प्रशस्त प्रॉपर्टी विकत घेण्यास भारतातील एका बड्या हस्तीने उत्सुकता दाखविली आहे. दुबईत 750 दशलक्ष दिरम्स ( 204 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात तब्बल 1,675 कोटींचा हा इटालियन मार्बल्सने नटलेला ‘मार्बल पॅलेस’ ( Dubai’s Marble Palace )  सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. काय आहे या मार्बल पॅलेसमध्ये आणि कोण तो विकत घेत आहे ते पाहूयात

दुबईतील रियल मार्केटमधील सर्वाधिक महागडी असलेली प्रॉर्पटी विकायला काढली आहे. या 60,000 चौरस फूटाच्या मॅन्शनला विकत घेण्यासाठी अब्जाधीशांमध्ये चढा ओढ लागली आहे. या मॅन्शलला ‘मार्बल पॅलेस’  असे टोपण नाव पडले आहे. या महालाच्या आत केवळ पाच बेडरूम आहेत. सर्वात मोठी बेडरूमची चार हजार चौरस फूटांच असून तिचा आकार एखाद्या प्रशस्त घरापेक्षाही मोठा आहे. या प्रायमरी बेडरूमची साईज चार हजार स्वेअर फूटाची आहे.

70,000 लिटर पाण्याचे एक्वेरियम

मार्बल पॅलेसच्या तळमजल्यावर डायनिंग आणि एन्टरन्टेटमेंटच्या रुम्स आहेत. इतर सुविधात 15 कार पार्कींगची सोय आहे. इनडोअर आणि आऊट डोअर स्विमिंग पूल आहेत, दोन डोम आहेत. 70,000 लिटर पाण्याचे कोरल रिफ एक्वेरियम आहे. तसेच वीजेसाठी स्वतंत्र पॉवर सबस्टेशन आहे आणि पॅनिक रुमही आहे. बाहेर 70 हजार स्वेअर फूटांचे गोल्फ कोर्स आहे. मार्बल पॅलेससाठी 80 ते 100 मिलीयन दिरहमचा इटालियन मार्बल वापरल्याने या मार्बल पॅलेस असे नाव पडले आहे. हा महाल बांधण्यासाठी 12 वर्षे लागली असून तो साल 2018 मध्ये बांधून पूर्ण झाला.

मंदी टीकूनही घराची किंमत तिच

घराला सध्याच्या मालकाने त्यांच्या 19व्या आणि 20व्या शतकातील वैयक्तिक कला संग्रहातील सुमारे 400 कलाकृतींनी सजवलेले आहे.  घर विकत घेताना या वस्तू आणि फर्निचर विकत घेऊ शकता असे  Luxhabitat Sotheby’s ब्रोकर कुणाल सिंह यांनी म्हटले आहे. 2020 च्या पासून दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदी आहे, कोविड-19 साथीमुळे जागतिक मंदीमुळे येथेही मंदी जास्त काळ टीकूनही या घराची किंमत घटलेली नाही.

जगातीस सर्वात महागडे घर कोण घेतंय

ऑगस्ट 2022 ला सर्वात महागडे घर 210 दिरहम ( प्रति चौरस फूट 5,614 दिरहम ) विकले गेले होते. मार्बल पॅलेस दर मंदीही प्रति चौ.फूट 12,500 दिरहम स्थिर आहे. हे घर Luxhabitat Sotheby’s मार्केटींग डायरेक्टर केरी मायकल या म्हणतात की हे घर विकत घेण्यास उत्सुक असलेली व्यक्ती नक्कीच राजकारणातील असून तिला लोकांचे मनोरंजन करायला आवडते. एमिरेट्स हील्सच्या या घरात तुम्ही ओबामाला बोलावू शकता, दुबईच्या शेखना निमंत्रण देऊन त्यांचे मनोरंजन करू शकता. हे घर दुबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटरपासून कारने अवघ्या 25 मिनिटांवर आहे. जी व्यक्ती हे घर घेण्यास उत्सुक आहे तिच्या या हील्सवर ऑलरेडी अकरा मालमत्ता असल्याचे केरी यांनी म्हटले आहे.