नवी दिल्ली : युक्रेन युद्धानंतर रशियाने भारताला मोठे सहकार्य केले. स्वस्तात कच्चा तेलाची (Crude Oil) भारताला विक्री केली. भारतीय तेल कंपन्यांनी कच्चा तेलावर प्रक्रिया करुन ते युरोपला विकले. स्वस्तात कच्चे तेल मिळाल्याने कंपन्यांना फायदा झाला. युरोपात तेल विक्रीतून कमाई झाली. तर भारतीय बाजारात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) गगनाला भिडला आहे. म्हणजे तेल उत्पादक कंपन्यांना कच्चा तेलावर वर्षभरात तिप्पट नफा कमावत आहेत. तर केंद्रासह राज्य सरकार आव्वाच्या सव्वा शुल्क आकारुन मालामाल झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर मात्र वर्षभरापासून रोज दरोडा घालण्यात येत आहे. त्यांना कसलाच फायदा झाला नाही. पेट्रोल-डिझेल महागड्या दरानेच त्यांना खरेदी करावे लागत आहे.
कमाईच कमाई
युक्रेन युद्धानंतर भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
कच्चा तेलात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात आज पुन्हा वाढ झाली. 7 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.54 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 71.83 डॉलर प्रति बॅरल झाला. गेल्यावर्षीपेक्षा हे भाव कमी आहेत.
कच्चा तेलाचा भडका
रशिया-युक्रेन युद्ध गेल्यावर्षी भडकले. मार्च 2022 मध्ये कच्चे तेलाचे भाव गगनाला भिडले.. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.
सकाळीच भाव अपडेट
भारतीय तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा भाव अपडेट केले आहे. सकाळी 6 वाजता इंधनाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. हे भाव पुढील 15 दिवसांसाठी कायम राहत असत.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)