GAS CYLINDER : व्याज दरात वाढ ते गॅसचा भडका, उष्णतेसोबत महागाईच्या झळा; मे महिन्यात ‘हे’ बदल

देशाच्या अर्थव्यवस्थेत गतिमानतेने मोठे बदल होत आहे. पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती इंधनाचे (GAS CYLINDER) दरात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यासोबतच सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील महागाई यादीत जोडले गेले आहेत.

GAS CYLINDER : व्याज दरात वाढ ते गॅसचा भडका, उष्णतेसोबत महागाईच्या झळा; मे महिन्यात ‘हे’ बदल
घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 6:48 PM

नवी दिल्ली : भारतासोबत आंतरराष्ट्रीय अर्थपटलावर मोठे फेरबदल होत आहे. इंधनाच्या दरापासून (OIL PRICES) बँकाच्या व्याजदरांपर्यंत मोठ्या बदलांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यात इंधनाच्या दरांत सातत्याने चढ उतार होत आहे. उष्णतेच्या तीव्र झळा अनुभवणाऱ्या सर्वसामान्यांना आगामी मे महिन्यात महागाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. उद्यापासून नव्या महिन्याला सुरुवात होत आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात मोठे बदल होणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत गतिमानतेने मोठे बदल होत आहे. पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती इंधनाचे (GAS CYLINDER) दरात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यासोबतच सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील महागाई यादीत जोडले गेले आहेत. गेल्या दोन महिन्यात सीएनजी भावात पाच वेळा वाढ नोंदविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल (CRUDE OIL) आणि नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्यामुळे इंधनाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली जात आहे.

गॅस भडकणार:

मे महिन्याच्या सुरुवातीला गॅस कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या फेररचनेबाबत निर्णय घेणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढविले होते. त्यासोबतच राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवरुन 950 रुपयांवर पोहोचली होती.

UPI मर्यादेत वाढ

रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी एक मे महिन्यापासून UPI पेमेंट मर्यादेत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणुक कंपनी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातू 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतात. सध्या यूपीआय पेमेंटची मर्यादा दोन लाख रुपये होती. आयपीओत यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा एक मे पासून लागू होणार आहे.

हे सुद्धा वाचा

बँका बंद

मे महिन्याच्या सुरुवातीलाच बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस बँका बंद असणार आहे. एक मे ला रविवार, 2 आणि 3 मे ला ईद व अन्य सणाच्या निमित्ताने सुट्टी असणार आहे. मे महिन्यात एकूण अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.