Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति 33 रुपये लिटर स्वस्त झाले भावा, तुम्हाला कधी मिळेल दिलासा..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरणार तरी केव्हा?

Petrol-Diesel : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति 33 रुपये लिटर स्वस्त झाले भावा, तुम्हाला कधी मिळेल दिलासा..
इंधन दर कधी आटोक्यात येणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crude Oil Price in International Market) किंमती झपाट्याने उतरल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलाचे भाव घसरले आहेत. या कच्चा तेलापासूनच पेट्रोल आणि डिझेल तयार होते. भारत गरजेसाठी 85 टक्के इंधन आयात करतो. गेल्या मार्च महिन्यापासून कच्चा तेलाचे दर सातत्याने कमी (Crude Oil Price Crash) होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल बॅरलच्या रुपात मापले जाते. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या सहा महिन्यांपासून स्थिर आहेत. इंधन स्वस्त होऊनही भारतातील जनतेला त्याचा फायदा झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय कच्चे तेलाचे लिटर आणि रुपयाचा हिशेब पाहता, कच्च्या तेलाची किंमत 9 महिन्यात 33 रुपये प्रति लिटरहून अधिकने कमी झाल्या आहेत. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) कमी झाल्या नाहीत.

पण केंद्र सरकारवर दबाव वाढत आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. यापूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निकालानंतर हा निर्णय होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.

हे सुद्धा वाचा

मार्च महिन्यात क्रूड ऑईलचा भाव गगनाला भेडले होते. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 140 डॉलर प्रति बॅरल (एक बॅरल मध्ये 159 लिटर असते) इतका उच्च स्तरावर पोहचला होता. तर अमेरिकन क्रूड ऑईलचा दर 131 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला होता. पण त्यानंतर या दोन तेलामध्ये घसरण सुरु झाली.

ब्रेंट क्रूड 76.10 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआयचे भाव 71.02 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. याचा सरळ अर्थ की, या दोन्ही तेलाच्या किंमतीत 46 टक्क्यांची घसरण झाली. हा दर सातत्याने घसरणीवर असल्याने देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमत कमी होण्याची आशा होती.

IIFL चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार, ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात अजून घसरण होणार आहे. अमेरिकेने इराणवरील प्रतिबंध हटविले आहे. याचा अर्थ इराणचे कच्चे तेलही बाजारात दाखल होईल. त्यामुळे तेलाची आवक वाढेल आणि किंमती अजून घसरतील.

गुप्ता यांच्या अंदाजानुसार, क्रूड ऑईलच्या किंमती अजून घसरतील .ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे नुकसान ही भरून निघाले आहे. जानेवारी महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती 10 ते 15 रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्यास भाव आणखी कमी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.