OK TATA : ट्रकच्या मागे ‘ओके टाटा’ असे का लिहीलेलं असतं ? काय त्याचा अर्थ
अनेकदा आपण प्रवासात पाहिलेले असेल की ट्रकच्या मागे ओके टाटा असे लिहीलेले असते. ही अक्षरं गाडीच्या नंबर प्लेटच्या आकड्याहून मोठ्या अक्षरात लिहीलेली आढळतात. अनेकांना याचा अर्थ माहिती नसतो. काय आहे या शब्दा मागचा अर्थ पाहूयात...
Ratan Tata: रस्त्यावरील वाहनांच्या मागे बहुतेकदा ट्रकच्या मागे अनेक शेरोशायरी वाचत तुम्ही प्रवास केलेला असेल. अनेकदा या शेरोशायरी मनोरंजनाबरोबर ज्ञान वाढविणाऱ्याही असतात. अनेकदा ट्रकच्या मागे ओके टाटा, किंवा हॉर्न ओके प्लीझ असे लिहीलेले असते. काही जणांच्या मते ट्रक ओळखण्यासाठी असे लिहीलेले असते. परंतू असे काही नाही. यामागे देखील टाटा यांचे कनेक्शन आहे. ट्रकच्या मागे यापुढे शेरो शायरीसोबत लिहीलेल्या ओके टाटा याचाही अर्थ जाणून घ्यायला हवा. याचे उत्तर टाटा ग्रुपकडून मिळते. जे दुचाकी आणि चारचाकी आणि ट्रकच्या निर्मितीतही पुढे आहे. परंतू दुचाकी आणि चार चाकीवर असे काही लिहीलेले नसते मग ट्रकवर ओके टाटा असे का लिहीलेले असते ?
अशा प्रकारचे ओके टाटा हे शीर्षक केवळ त्याच ट्रकवर लिहीलेले असते ज्यांची निर्मिती टाटा कंपनीने केलेली आहे. तसेच जर वाहनांवर ओके टाटा लिहीलेले असेल म्हणजे त्याची टेस्टींग झालेली आहे. आणि ते वाहन योग्य स्थितीत आहे. हे लिहिण्या मागे एक तर्क असाही आहे की गाडीचे मॅन्युफॅक्चरींग आणि रिपेअरिंग टाटा मोटर्स कंपनीच्या मानकांनुसार झालेली आहे. या वाहनांची वॉरंटी केवळ टाटांकडे आहे. हे बिंबवण्यासाठी अशा प्रकारची ओके टाटा अशी मोहर लावलेली असते.
ब्रॅंडींगचा आधार बनले…
ओके टाटा ….कंपनीने भलेही हे दोन शब्द आपल्या पॉलीसीसाठी बनवले आणि ट्रकवर लिहीले,परंतू हळूहळू हे ब्रॅंडींगचा हत्यार बनले. ट्रकच्या आधारे हे शब्द देशभरात पसरले. आजही अगर कोणाला ओके टाटा असे म्हटले की तो समजतो की कुठे हे शब्द जादा लिहीलेले असतात.
ट्रकची निर्मिती करणारी टाटा मोटर्स आज देशाची टॉपची ऑटोमोबाईल कंपनी आहे. याची सुरुवात साल 1954 पासून झाली.टाटा इंजिनिअरिंग एण्ड लोकोमोटीव्ह कंपनी रुपात या कंपनीची सुरुवात झाली त्यानंतर याचे नाव बदलून टाटा मोटर्स असे करण्यात आले.त्यावेळी ही कंपनी रेल्वेची इंजिन तयार करायची. दुसऱ्या महायुद्धात टाटाने सैन्याला टॅंक ( तोफ ) बनवून दिला होता. टाटानगर टॅंक नावाने तो ओळखला जात असे. या टॅंकने शत्रूची वाताहत करुन टाकली. काही काळांनी टाटाने ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मर्सिडीझ बेंझ सोबत भागीदारी करीत साल 1954 मध्ये व्यावसायिक वापरासाठी वाहन लॉंच केले. कंपनीने 1991 मध्ये प्रवासी वाहन बनविण्यासाठी सुरुवात केली. पहिली स्वदेशी कार निर्माण केली. टाटा सिएरा तिचे नाव. त्यानंतर अनेक कारची निर्मिती करुन टाटा देशाची टॉपची ऑटोमोबाईल कंपनी बनली.
त्यानंतर टाटाने इस्टेट, टाटा सुमो या वाहनांना बाजारात उतरवले, टाटा सुमो भारतीय बाजारात लोकप्रिय केली. त्यानंतर टाटा इंडिका बाजारात प्रसिद्ध झाली. या फॅमिली कारला साल 1998 मध्ये बाजारात आणले. ज्याने विक्रीत रेकॉर्ड केले. टाटा ग्रुपला वेगळ्या उंचीवर नेणारे रतन टाटा आज आपल्यात नाहीत. त्यांचे कार्य आणि संघर्ष अनेकांना प्रेरणा देत राहील.