नवी दिल्ली : 10 फेब्रुवारी २०२३ ला ओकाया आपली येणारी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooters) लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक टीजर (teasers) जारी केलं. ही गाडी १० फेब्रुवारीला लाँच होणार असल्याचं कंपनीनं म्हंटलंय. येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव फास्ट एफ ३ आहे. आता जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स. २०२२ इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीसाठी खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली. याशिवाय इलेस्ट्रिक व्हेईकलच्या विक्रीत चांगली वाढ होत आहे. गेल्या वर्षीची वाढ पाहता काही इलेक्ट्रिक मॅन्यूफॅक्चरर यावर्षी एकापेक्षा एक अॅडव्हॉन्स स्कूटर लाँच करण्यासाठी तयार आहेत.
ओकायाचे हे येणारे इलेक्ट्रिक स्कूटर १२०० व्हॅट मोटार आहे. हे मोटार २५०० व्हॅटचा पॉवर जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.
ओकायाच्या पोर्टफोलियात हे चौथे इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची किंमत १ लाख १३ हजार ९९९ रुपये एक्स शोरूम आहे. ओकायाचे अन्य स्कूटर्स फास्ट ४, फ्रीडम आणि क्लासिक आयक्यू आहेत. फास्ट ४ मध्ये डुयल ७२ व्ही ३० एएच एलएफपी बॅटरी आहे.
कंपनीचा असा दावा आहे की, रायडिंग रेंज १४०-१६० किमीच्या मधात आहे. यात तीन रायडिंग मोड आहेत. ईको, सिटी आणि स्पोर्टस. याची टॉप स्पीड ६०-७० किलोमीटर प्रती तास आहे. ओकाया फास्ट एफ ४ची किंमत १ लाख १४ हजार रुपये एक्स शोरूम आहे.
भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. काही राज्य यासंदर्भात स्कीम जाहीर करत आहेत. याबाबात पंजाब सरकारने मोठं पाऊल उचललं. प्रदूषण कमी व्हावं, यासाठी पंजाब सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे.