दिवाळीच्या आधीच ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे निघणार दिवाळे! शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर लटकटी तलवार!

Ola कंपनी आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. दिवाळीच्या आधी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामागचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊया.

दिवाळीच्या आधीच 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे निघणार दिवाळे! शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर लटकटी तलवार!
कर्मचारी कपात Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:00 PM

बंगरुळू,  टॅक्सी व्यवसायातील अग्रगण्य कंपनी ओलाशी (Ola) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी कपातीचा (Staff Reduction) परिणाम ओला कंपनीवरही पाहायला मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की, कंपनी आपल्या सॉफ्टवेअर टीममध्ये काम करणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते. कंपनीचे हे मोठे पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे, चला जाणून घेऊया.

मिळालेल्या माहितीनुसार  कर्मचारी कपातीमागचे मुख्य कारण काही काळापूर्वी लॉन्च झालेल्या Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची घसरलेली विक्री असल्याचे सांगितल्या जात आहे. सूत्रांच्या मते  Ola आपल्या सॉफ्टवेअर टीममधून सुमारे 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.

कंपनीचे काय म्हणणे आहे

या बाबतीत, ओलाचे प्रवक्ते म्हणतात की, ओला इलेक्ट्रिक ही भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी आहे आणि कंपनीचे लक्ष विक्री, वाहन, बॅटरी ऑटोमेशन, उत्पादन आणि स्वायत्त अभियांत्रिकी यासारख्या गोष्टींवर आहे. याशिवाय कंपनी नॉन-सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग डोमेनवरही लक्ष केंद्रित करत आहे.

हे सुद्धा वाचा

ओला कंपनीमध्ये सध्याच्या स्थितीत  2000 अभियंते आहेत आणि कंपनीचे उद्दिष्ट पुढील 18 महिन्यांत 5 हजारांपर्यंत अभियांत्रिकी कर्मचारी वाढवण्याचे आहे.

अनेक बड्या लोकांनी सोडली कंपनी

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील अनेक उच्च-स्तरीय अधिकारी गेल्या दोन वर्षांत कंपनीला रामराम ठोकला आहे.

काही काळापूर्वी कंपनीने त्याच्या पूर्व-मालकीच्या कार व्यवसाय ओला कार्स आणि कंपनीच्या द्रुत वाणिज्य व्यवसाय ओला डॅशमधून सुमारे 2,000 कर्मचारी काढून टाकले होते. सुरवातीला अत्यंत तेजीने स्पर्धकांना मागे टाकणाऱ्या ओला कंपनीला इलेक्ट्रिक बाईक क्षेत्र फारसे झेपले दिसत नसल्याचे चित्र आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.