Hasmukh Parekh : चाळीत गेले बालपण, देशाला दिली सर्वात श्रीमंत बँक, हसमुख भाईंची कहाणी काय

Hasmukh Parekh : उतारवयात अनेकांना आराम करण्याचे वेध लागतात. पण याच काळात हसमुख भाई यांनी जगातील सर्वात श्रीमंत बँक उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मोठा इतिहास घडवला. कोण आहेत हसमुख भाई, त्यांची वाचा कहाणी

Hasmukh Parekh : चाळीत गेले बालपण, देशाला दिली सर्वात श्रीमंत बँक, हसमुख भाईंची कहाणी काय
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली : एचडीएफसी बँक, एचडीएफसी कंपनी लिमिटेड यांच्या विलिनीकरण झाले. 9 लाख कोटी रुपयांहून अधिकचे भांडवलासह एचडीएफसी बँक सर्वात श्रीमंत बँक(HDFC Bank) ठरली आहे. या बँकेचा प्रवास इतका सोपा नव्हता. ही बँक हसमुखभाई ठाकोरदास पारेख (Hasmukh Bhai Parekh) यांनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या बँकेची स्थापना करणारे हसमुखभाई मुंबईतील एका चाळीत राहत होते. त्यांनी अत्यंत गरिबीत जीवन काढले. जिद्दीने शिक्षण घेतले. हसमुखभाईंची मेहनतीने रंग भरला. एचडीएफसी बँक भारतातील मोठी व्यावसायिक बँक ठरली. हसमुख भाईंचे पुतणे दीपक पारेख यांनी भरीव योगदान दिले. आज या बँकेने भारतातच नाही तर जगात इतिहास रचला आहे.

वडिलांकडून मिळाली शिदोरी कष्ट करण्याची आणि बँकिंग सेवांची माहिती हसमुख भाईंना त्यांचे वडील ठाकोरदास पारेख यांच्याकडून मिळाले. हसमुख पारेख यांनी त्यांचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडन येथे गेले. ब्रिटेनमधून ते भारतात परत आल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एचडीएफसी बँकेचा पाया घातला.

शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब हसमुख ठाकोरदास पारेख यांनी शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब केला. मुंबईत त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांना ब्रिटेनला शिक्षणाची संधी मिळाली. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून त्यांनी बँकिंग आणि फायनान्स याविषयीत बीएससीची पदवी मिळवली. त्यानंतर हसमुख पारेख भारतात परतले. ते मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

हे सुद्धा वाचा

स्टॉक ब्रोकिंग फर्म त्यानंतर त्यांनी स्टॉक ब्रोकिंग फर्म हरकिसनदास लखमीदास या फर्मसोबत कामाला सुरुवात केली. आयसीआयसीआयमध्ये पण त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीपूर्वी ते याठिकाणी उप महाप्रबंधक म्हणून काम केले होते.

निवृत्तीनंतर बँकिंग व्यवसाय 66 व्या वर्षी लोक सेवानिवृत्तीनंतर घरी बसण्याचा अथवा आराम करण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी हसमुखभाई यांनी भारतातील मध्यमवर्गातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याची कल्पना सुचली. त्याकाळी कर्ज मिळणे अवघड होते. तसेच कर्ज घेण्याचा प्रघात नव्हता. अशावेळी मध्यमवर्गाला कर्ज देण्यासाठी त्यांनी 1977 मध्ये एचडीएफसी ही वित्तीय संस्था सुरु केली. 1978 मध्ये त्यांनी पहिले गृहकर्ज दिले.

सर्वात मोठी बँक 1984 पर्यंत एचडीएफसी 100 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक कर्ज वाटप केले होते. 1992 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म भूषण देऊन सन्मान केला होता. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे नुकतेच विलिनीकरण झाले. आता ही 14.14 लाख कोटी रुपयांची बँक झाली आहे.

काका-पुतण्याने उभारली बँक एचडीएफसीचे पूर्व चेअरमन दीपक पारेख, हसमुख पारेख हे काका-पुतणे आहेत. हसमुख पारेख यांनी त्यांचे पुतणे दीपक पारेख यांनी पण एचडीएफसी बँकेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बोलावले होते. त्यांचा हा निर्णय एकदम योग्य ठरला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.