नवी दिल्ली : ऑनलाईन कर्ज सेवा प्रदाती डिजिटल कंपनी क्रेडिटबीने (KreditBee) अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी नवीन सेवा सुरू केली आहे. क्रेडिटबीद्वारे डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट क्रेडिटबी ’24K गोल्ड’ लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोने खरेदी करु इच्छिणारे ग्राहक केवळ एक टॅपवर क्रेडिटबी अॅप वरुन सोने खरेदी करू शकतात. सध्या ही ऑफर केवळ निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. टप्प्याटप्याने सर्व ग्राहकांसाठी खुली केली जाणार आहे. किमान एक रुपयापासून कमाल तीन लाखांपर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करू शकतात. कंपनी लवकरच या मर्यादेच्या पलीकडे अधिक रकमेची गुंतवणूक सुविधा उपलब्ध करणार आहे. कंपनीने नव्या सेवेसाठी सेफगोल्ड (safegold) सोबत सहकार्यात्मक भागीदारी केली आहे.
सेफगोल्ड हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याद्वारे ग्राहक थेट सोन्याची डिजिटल खरेदी-विक्री करण्यास सक्षम ठरतात. क्रेडिटबीने ग्राहकांना तत्काळ, सुरक्षित आणि वास्तवि वेळेत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुविधा प्रदान केली आहे.
खरेदी केलेल्या सोन्याचे कॉईन किंवा बारमध्ये देखील रुपांतर करण्याची मुभा असणार आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष सोन्याची आवश्यकता असल्यास देशभरातून आपल्या घरात सोन्याची डिलिव्हरी प्राप्त करू शकतो. मात्र, सोन्याच्या डिलिव्हरी साठी सोन्याचे प्रमाण किमान 5 ग्रॅम असावे. सोन्याचे व्यवहार सेफगोल्डद्वारे फ्री ट्रान्झिट इन्श्युरन्सद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे.
1.ग्राहकांना खरेदी व विक्री साठी प्रमाणित 24 कॅरेट गोल्ड उपलब्ध होते
2. ग्राहक कमाल एक ते किमान तीन लाख रुपयांचे सोने खरेदी करू शकतात.
3.सोन्याला 100 टक्के विमा असलेल्या सुरक्षित संग्रहामध्ये ठेवले जाते.
4.ग्राहक थेट आपल्या घरी सोन्याच्या डिलिव्हरीचा थेट लाभ घेऊ शकतात. किंवा मर्चंट पार्टनरच्या माध्यमातून सोन्याचं रुपांतरण करू शकतात.
5.ग्राहक सेफगोल्ड स्टोअरमधील डिजिटल गोल्डला वर्तमान बाजारभावात विक्री देखील करू शकतात.
क्रेडिटबी अपमध्ये साईन-इन करा. डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी ‘डिजिटल गोल्ड सेक्शन’वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोने खरेदी याद्वारे निश्चिंतपणे करू शकाल.