Gold Silver Price Today : अक्षय तृतीया गोड होणार! सोने-चांदीने टाकली नांगी
Gold Silver Price Today : यंदाची अक्षय तृतीया गोड होण्याची शक्यता दाट आहे. गेल्या शनिवार, 15 एप्रिलपासून सोने-चांदीच्या किंमती घसरणीवर आहे. ही घसरण मोठी नसली तरी किंमती न वाढल्याचा ग्राहकांना दिलासा आहे. आज सकाळच्या सत्रात जाणून घ्या किती कमी झाल्या किंमती..
नवी दिल्ली : सोने-चांदीच्या (Gold Silver Price) विक्रमी धावसंख्येला सध्या ब्रेक लागला आहे. यंदाची अक्षय तृतीया गोड होण्याची शक्यता दाट आहे. गेल्या शनिवार, 15 एप्रिलपासून सोने-चांदीच्या किंमती घसरणीवर आहे. ही घसरण मोठी नसली तरी किंमती न वाढल्याचा ग्राहकांना दिलासा आहे. 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे. अनेक जण या दिवशी सोने-चांदीची खरेदी शुभ मानतात. पण यंदा सोने-चांदीच्या दरवाढीने अनेकांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले आहे. सोन्याने गेल्या सहा महिन्यांत 11000 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदीच्या किंमती पण गगनाला भिडल्या आहेत. दिवाळीपर्यंत 50 हजारांच्या आतबाहेर असणारे सोने आता 70 हजारी मनसबदार होण्याच्या तयारीत आहे.
सोन्यात 810 रुपयांची घसरण गुडरिटर्न्सनुसार, 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा होते. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,950 रुपये होता. आज 19 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 55,990 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोने 61,160 रुपयांवर पोहचले. म्हणजे सोन्यात गेल्या चार दिवसांत 810 रुपयांची घसरण कायम आहे.
चांदी खरेदीची संधी चांदी 14 जानेवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये शनिवारी 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला. रविवारी आणि सोमवारी हाच भाव कायम होता. बुधवारी 19 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात भाव अपडेट झाले नसले तरी एक किलो चांदीचा भाव 77,400 रुपये होता. चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना खरेदीची मोठी संधी आहे. चांदीने जानेवारी ते मार्च महिन्यात 12 टक्के परतावा दिला आहे.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
बँकांनी एलटीव्ही केला कमी सध्या सोन्याच्या किंमती रेकॉर्डस्तरावर आहेत. सोने प्रचंड महाग झाले आहेत. त्यामुळे बरेच ग्राहक गरजा भागविण्यासाठी सोन्यावर कर्ज घेत आहेत. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या मोबदल्यात सोन्यावरील कर्ज स्वस्त आणि सहजरित्या मिळते. निम शहरी आणि ग्रामीण भागात सोने तारण ठेऊन मिळणारे कर्ज लोकप्रिय आहे. सध्या सोन्याच्या किंमती अधिक असतानाही ग्राहकांना या दरवाढीचा फायदा मिळताना दिसत नाही. कारण बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी एलटीव्ही कमी केला आहे.
बँकांना कसली भीती बँका आणि वित्तीय संस्थांना सोने ज्या गतीने आगेकूच करत आहेत, त्याच गतीने ते माघारी फिरेल असे वाटत आहे. म्हणजे सध्या सोन्याची जी वाढ आहे ती एक फुगवटा असल्याची भीती बँकांसह वित्तीय संस्थाना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी एलटीव्ही 90 टक्क्यांहून कमी करण्यात आला आहे. 90 टक्क्यांआधारे कर्ज दिल्यास आणि भावात पुन्हा घसरण झाल्यास कर्ज बुडण्याची भीती बँकांना वाटत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.