Film Producer : रिअल फुन्सुक वांगडू! कधी होती टूथब्रशची फॅक्टरी, आता तयार करतात हिट पिचर

Film Producer : प्रयोगशील व्यक्तीला आकाश ठेंगणे असते, नाही का? कधी काळी टूथब्रश तयार करण्याची फॅक्टरी असणाऱ्या या व्यक्तीने चित्रपट निर्माता म्हणून मिळविलेले यश अफलातून आहे...

Film Producer : रिअल फुन्सुक वांगडू! कधी होती टूथब्रशची फॅक्टरी, आता तयार करतात हिट पिचर
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली : बॉलिवूड चित्रपट (Bollywood Cinema) तुम्ही अनेक अशा कथा पाहिल्या असतील की, त्यात गरीब वा मध्यमवर्गातील व्यक्ती त्याच्या मेहनतीने मोठा उद्योगपती झाला. पण काही कथा या चित्रपटासारख्याच खऱ्याखुऱ्या पण घडतात. या कथा प्रत्यक्षात उतरतात. प्रत्येक यशस्वी उद्योगपतीच्या मागे अशी एक रोचक कथा असतेच. ती वाचताच आपल्या तोंडून क्या बाते है, असं आपसूकच निघतं. तर भुरळ घालणाऱ्या बॉलिवूडमधील अशाच व्यक्तीची कथा तुम्हाला प्रेरणा देईल. कधी काळी ही व्यक्ती टूथब्रश तयार करणाऱ्या कारखान्याची (Toothbrush Factory) मालक होती. पण मेहनतीच्या बळावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याच्या मल्टिस्टारर आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षकांवर मोहनी बसली आहे.

रॉनी स्क्रूवाला बॉलिवूड फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला (Ronnie Screwvala) हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. त्यांनी UTV मोशन पिक्चर्सची स्थापना केली. त्यांनी जोधा अकबर, रंग दे बसंती, उरी-द सर्जिकल स्ट्राईकसह अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. या सिनेमांनी देशातच नाही तर परदेशात पण जबरदस्त कमाई केली. रॉनी स्क्रूवाला यांचा इथपर्यंतच प्रवास थक्क करणारा आहे.

1980 मध्ये करिअरची सुरुवात रोहिंटन सोली स्क्रूवाला असे त्यांचे मुळ नाव आहे. रॉनी स्क्रूवाला यांच्या करिअरची सुरुवात 1980 च्या दशकात झाली होती. त्यावेळी भारतात केबल टेलिव्हिजनची सुरुवात झाली होती. 1990 मध्ये त्यांनी मनोरंजन समूह UTV ची स्थापना केली. आज त्यांची ओळख लोकप्रियच नाही तर यशस्वी चित्रपट निर्मात्यांमध्ये करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

ब्रश फॅक्टरी 1980 च्या दशकात रॉनी स्क्रूवाला यांनी लेजर ब्रशची स्थापना केली होती. देशातील ही सर्वात मोठी टूथब्रश कंपनी ठरली. पण 1990 मध्ये त्यांच्या जीवनात अनेक घडामोडी घडल्या आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अवघ्या 37,500 रुपयांसह टीव्ही प्रोडक्शन कंपनी UTV ची स्थापना केली. 2012 मध्ये वॉल्ट डिझनीने 454 दशलक्ष डॉलरला हा ब्रँड खरेदी केला होता.

इतक्या संपत्तीचे मालक हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, रॉनी स्क्रूवाला यांची एकूण संपत्ती 12,800 कोटी रुपये आहे. त्यांनी UTV मोशन पिक्चर्सची स्थापना केली. त्यांनी जोधा अकबर, रंग दे बसंती, उरी-द सर्जिकल स्ट्राईकसह अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. या सिनेमांनी देशातच नाही तर परदेशात पण जबरदस्त कमाई केली. रॉनी स्क्रूवाला यांचा इथपर्यंतच प्रवास थक्क करणारा आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....