Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक लाखांचे एक कोटी, ते तीन शेअर कोणते? ग्रोक AI ने केले मोठे भाकीत

Grok AI big prediction about 3 Shares : शेअर बाजार या आठवड्यात थोडासा ट्रॅकवर आला म्हणावे लागेल. या वर्षात शेअर बाजाराचा मूड ठीक नाही. गुंतवणूकदारांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यातच ग्रोक एआयने या तीन स्टॉकला जादूचा दिवा म्हटले आहे.

एक लाखांचे एक कोटी, ते तीन शेअर कोणते? ग्रोक AI ने केले मोठे भाकीत
ग्रोक एआयचा काय वादा?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 3:56 PM

शेअर बाजारात मोठा बदल होत आहे. भारतीय शेअर बाजाराने तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षात मोठी कात टाकली आहे. सेबीच्या नवीन धोरणामुळे आता झटपट रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा होत आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाने अनेकांना भुरळ घातली आहे. कोणताही वेडावाकडा सवाल केला तरी त्याचे मुद्देसुद उत्तर मिळण्याची हमी एआयमुळे मिळाली आहे. चॅटजीपीटी, डीपफेक, ग्रोक हा एआय चॅटबॉट या माध्यमांचा आता वापर वाढत आहे. तर ग्रोक एआयने या तीन स्टॉकला जादूचा दिवा म्हटलं आहे. हे तीन स्टॉक एक लाखांचे एक कोटी रुपये परतावा देतील असा दावा एआयने केला आहे.

ग्रोक एआयने (Grok AI) ने तीन शेअर्सची नावे सुचवली आहेत. ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीत 1 लाखांचे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचा परतावा दिला आहे. या तीन शेअर्समध्ये सर्वात अगोदर, महागडा स्टॉक MRF हा आहे. त्यानंतर Bajaj Finance आणि एशियन पेंट्सचा समावेश आहे.

एमआरएफचा स्टॉक 25 वर्षांपूर्वी 1000 रुपयांच्या घरात होता. सध्या हा शेअर 1,11,230 रुपयांवर आहे. ज्या गुंतवणूकदारांनी त्यावेळी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवलेले आहेत, आज त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

बजाज फायनान्सच्या शेअर किंमत 9 वर्षांपूर्वी 800 रुपयांपेक्षा कमी होती. आता हा शेअर 8500 रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या 9 वर्षात या शेअरमध्ये 1 लाखांचे आता 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा परतावा मिळाला असता.

एशियन पेंट्सच्या शेअरची किंमत 2009 साली 80 ते 100 रुपयांदरम्यान होती. आता 15 वर्षानंतर या शेअरची आजची किंमत ही 2,289.75 रुपये आहे. त्यावेळी ज्यांनी या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक केली. त्यांना आता एक कोटींहून अधिकचा परतावा मिळाला असता.

गेल्या 10 वर्षांत मजबूत परतावा

गेल्या दहा वर्षातील निफ्टी 50 (NIFTY 50) आणि सेन्सेक्स (SENSEX) ची कामगिरी दिलासादायक आहे. भूतकाळातील ट्रेंड (Historical Performance) कडे पाहिले, तर त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत परतावा मिळाला आहे.

गेल्या 10 वर्षांत (2014-2024):

निफ्टी 50 सुमारे 3.5 पट वाढला आहे.

सेन्सेक्स सुमारे 3 पट वाढला आहे.

सरासरी12-15% वार्षिक वाढ (CAGR) झाली आहे.

पुढील 10 वर्षांसाठी अंदाज (Projection for Next 10 Years)

पुढील 10 वर्षांसाठी अंदाज काय?

जर भारतीय अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राने घोडदौड केली. तर येत्या 10 वर्षासाठी ChatGPT ने भारतीय बाजाराविषयी एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार,

निफ्टी 50: 2024 मध्ये सुमारे 22,000 आहे. 2034 पर्यंत 60,000 ते 75,000 होऊ शकतो.

सेन्सेक्स : 2024 मध्ये सुमारे 72,000 आहे. 2034 पर्यंत 2,00,000 पर्यंत पोहोचू शकतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम सेक्टर

बँकिंग आणि फायनान्स (HDFC Bank, ICICI Bank, SBI)

IT आणि टेक्नोलॉजी (TCS, Infosys, Wipro)

कंझ्युमर गुड्स (Asian Paints, HUL, Nestle India)

ग्रीन एनर्जी आणि EV (Tata Power, Reliance, Adani Green)

फार्मा आणि हेल्थकेअर (Sun Pharma, Dr. Reddy’s, Cipla)

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.