Petrol Diesel Price Today : परभणीत पेट्रोल-डिझेलचा भडका! तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किंमतीत एक डॉलरची घसरण झाली. पण क्रूड ऑईलने महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. या पंधरा दिवसांत भावात झरझर वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price Today : परभणीत पेट्रोल-डिझेलचा भडका! तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय
आज मिळाला का दिलासा
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली : आज राज्यात परभणीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) भडकल्या. नांदेड, परभणी, बीड आणि औरंगाबाद या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल महागले आहे. भावात सातत्याने चढउतार होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. आज या किंमतीत एक डॉलरची घसरण झाली असली तरी एकूण भावात मात्र मोठा दिलासा मिळालेला नाही. ओपेक देशांनी आणि रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच थेट महागाईवर परिणाम दिसून येत आहे. क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किंमतींनी महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. भारतीय तेल कंपन्यांना रशियानंतर इराकने पण स्वस्तात इंधन पुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

कच्चा तेलाचे भाव काय 14 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 82.51 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 86.42 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. परभणीत एक लिटर पेट्रोलचा भाव 109.47 तर डिझेलची किंमत 95.86 रुपये आहे.

दोन डॉलरचा फायदा भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

हे सुद्धा वाचा

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.35 तर डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.07 पेट्रोल आणि डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.01 आणि डिझेल 92.53रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....