नवी दिल्ली : आज राज्यात परभणीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) भडकल्या. नांदेड, परभणी, बीड आणि औरंगाबाद या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल महागले आहे. भावात सातत्याने चढउतार होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. आज या किंमतीत एक डॉलरची घसरण झाली असली तरी एकूण भावात मात्र मोठा दिलासा मिळालेला नाही. ओपेक देशांनी आणि रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच थेट महागाईवर परिणाम दिसून येत आहे. क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किंमतींनी महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. भारतीय तेल कंपन्यांना रशियानंतर इराकने पण स्वस्तात इंधन पुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
कच्चा तेलाचे भाव काय
14 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 82.51 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 86.42 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. परभणीत एक लिटर पेट्रोलचा भाव 109.47 तर डिझेलची किंमत 95.86 रुपये आहे.
दोन डॉलरचा फायदा
भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)