ONGC बनली देशातील सर्वाधिक नफा कमवणारी दुसरी कंपनी, जाणून घ्या टॉप पाच कंपन्यांबद्दल

सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 40,305 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. ही सर्वाधिक नफा कमवणारी देशातील दुसरी कंपनी ठरली आहे.

ONGC बनली देशातील सर्वाधिक नफा कमवणारी दुसरी कंपनी, जाणून घ्या टॉप पाच कंपन्यांबद्दल
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 2:59 PM

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 40,305 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा (Net profit) कमावला आहे. कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात आलेल्या तेजीमुळे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला मोठा नफा प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे आता ओएनजीसी ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी नफा मिळवणारी कंपनी ठरली आहे. ओएनजीसीने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 258 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 40,305.74 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये कंपनीला 11,246.44 एवढा निव्वळ नफा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला कच्च्या तेलाच्या प्रत्येक बॅरल मागे 76.62 डॉरची प्राप्ती झाली आहे. त्याच्या पूर्वीच्या आर्थिक वर्षात हेच प्रमाण प्रति बॅरल 42.78 डॉलर इतके होते. कच्च्या तेलाच्या दरात आलेल्या तेजीमुळे कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कच्च्या तेलातील तेजीचा फायदा

गेल्या आर्थिक वर्षात ओएनजीसीला कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलमागे 76.62 डॉरची प्राप्ती झाली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कच्च्या तेलाचे दर हे गेल्या 14 वर्षांती सर्वोच्च स्थरावर पोहोचले होते. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरल झाले होते. यापूर्वी 2008 मध्ये कच्च्या तेलाच्या दरात अशीच वाढ झाली होती. तेव्हा कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 147 डॉलरवर पोहोचले होते. कच्च्या तेलात तेजी आल्याने त्याचा फायदा हा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला झाला. ही सर्वाधिक नफा कमावणारी देशातील दुसरी कंपनी ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

टॉप पाच कंपन्या

रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफ्याच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो. रिलायन्सने गेल्या आर्थिक वर्षात 67,845 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. रिलायन्सनंतर ओएनजीसी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओएनजीसीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 40,305.74 कोटी रुपयांचा नफा कमावत टाटा स्टीलला मागे टाकले आहे. या यादीत टाटा स्टीलचा तिसरा क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात टाटा स्टिलला 33,011.18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. चौथा क्रमांक टाट कंसल्टेंसी सर्व्हिसेस टीसीएसचा लागतो. तर पाचव्या क्रमांकावर भारतीय स्टेट बँक असून, गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 31,676 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.