Cyber Fraud : मोबाईलमध्ये जपून ठेवा हा 4 अंकी क्रमांक, ऑनलाईन फसवणुकीत लगेच मिळेल मदत..

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीविरोधात हा रामबाण उपाय ठरेल फायद्याचा..

Cyber Fraud : मोबाईलमध्ये जपून ठेवा हा 4 अंकी क्रमांक, ऑनलाईन फसवणुकीत लगेच मिळेल मदत..
हा क्रमांक मदतीला येईलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 10:51 PM

नवी दिल्ली : देशभरात सायबर गुन्ह्याचा (Cyber Crime) आलेख जोरात वाढत आहे. ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर भामटे अनेक क्लृप्त्या वापरतात. वेगवेगळ्या कल्पना लढवत तुमचे खाते साफ करण्यात येते. ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सातत्याने जागरुकता कार्यक्रम आयोजित करते. केंद्र सरकारने ग्राहकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन ही सुरु केली आहे.

केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चार क्रमांकाचा एक नंबर दिला आहे. हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन घ्या. त्यामुळे गरजेच्यावेळी हा क्रमांक मदतीला येईल. या क्रमांकावरुन तुम्हाला सायबर फसवणुकीची तक्रार करता येईल. त्यामुळे हा क्रमांक सेव्ह करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनेरा बँकेने (Canara Bank) ग्राहकांना ट्विट करत या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली आहे. बँकेने ट्विट करत सांगितले की, आता कोणत्याही सायबर फसवणुकीविरोधात तुम्हाला थेट तक्रार करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईमच्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घेता येईल.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तुम्ही 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. हा क्रमांक तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करता येईल. https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही तुम्हाला तक्रार नोंदविता येईल.

CloudSEK या संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. त्यात 2021-22 या आर्थिक वर्षात वाढलेल्या सायबर गुन्ह्यातून हा आकडा समोर आला आहे. त्यानुसार भारतीय वित्त-बँकिंग आणि विमा क्षेत्रावर सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

याचा अर्थ, आता केवळ देशातीलच नाही तर देशाबाहेरील सायबर भामट्यांकडूनही तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सातत्याने अलर्ट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला तुम्ही बळी पडता कामा नये.

2021 मध्ये सायबर हॅकिंगच्या 469 घटना समोर आल्या आहेत. तर या वर्षी 2022 मध्ये एकट्या विमा क्षेत्रालाच सायबर भामट्यांनी लक्ष्य केले आहे. फसवणुकीच्या जवळपास 283 घटना समोर आल्या आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.