Online Fraud : FASTag वर पैसे परत मिळविण्याच्या नादात गमाविले 1.20 लाख, तुम्ही तर करत नाही ना ही चूक..

Online Fraud : FASTag वर पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून एका व्यापाऱ्याला गंडा घालण्यात आला आहे.

Online Fraud : FASTag वर पैसे परत मिळविण्याच्या नादात गमाविले 1.20 लाख, तुम्ही तर करत नाही ना ही चूक..
व्यापाऱ्याला घातला गंडाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 6:13 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. ते दररोज शिकार शोधतात, त्यांना जाळ्यात अडकवितात आणि आमिषाचे जाळे टाकून फसवितात. तुमचे खाते (Account) साफ करतात. आता याविषयीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुंबईतही सायबर भामट्यांनी एका व्यापाऱ्याला (Businessman) चांगलाच गंडा घातला आहे.

मुंबईतील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन शिकार करण्यात आले आहे. फास्टॅगच्या आधारे व्यापाऱ्याला गंडविण्यात आले आहे. सायबर भामट्यांनी व्यापाऱ्याचा तपशील चोरला आणि खात्यातील रक्कम उडवली. भामट्यांनी व्यापाऱ्याला 1.20 लाख रुपयांचा गंडा घातला.

पोलिसांनुसार, दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याचे फास्टॅग (FASTag) खात्यात चुकून जास्त रक्कम गेली. पैसे परत मिळविण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्च केले. कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधला. परंतु, हा क्रमांक कस्टमर केअरचा नव्हता, तर भामट्यांचा होता.

हे सुद्धा वाचा

भामट्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांनी गोडीगुलाबीने त्याचा तपशील माहिती करुन घेतला. त्यानंतर त्याचा मोबाईलच हॅक केला. त्यानंतर त्याच्या खात्यातून धडाधड रक्कम उडवली. खात्यातून 1.20 लाख रुपये काढले. त्यामुळे व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात याविषयी व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली. इलेक्ट्रिक सामान विक्रीचा या व्यक्तीचा व्यवसाय आहे. त्याला सामान विक्रीसाठी गुजरातला जायाचे होते. त्यामुळे त्याने त्याच्या फास्टॅग खात्यात (FASTag Account) रक्कम टाकली.

पण त्याने चुकून फास्टॅग खात्यात 1,500 रुपये टाकण्याऐवजी 15,000 रुपये या खात्यात जमा केले. ही रक्कम परत मिळविण्यासाठी त्याने गुगलवर सर्च केले. त्यावर त्याला फास्टॅगचा कस्टमर केअर क्रमांक मिळाला. त्यावर त्याने संपर्क साधला.

ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रकार घडत असताना, त्याने कस्टमर केअरवर तपशील देताना सजगता दाखवली नाही. त्याने इंटरनेटवरील त्या संकेतस्थळाचा अधिकृतपणा तपासला नाही. ज्या वेबसाईटवर तो गेला ती फास्टॅगची अधिकृत वेबसाईट नव्हती. त्याचाच या व्यापाऱ्याला मोठा फटका बसला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.