घरातील महिलेच्या नावे उघडा येथे खाते, तुमचा असा होईल मोठा फायदा

International Women Day | आज जागतिक महिला दिवशी पत्नी, आई अथवा बहिणीला एक चांगले गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट त्यांच्या आणि कुटुंबाच्या फयद्याचे ठरु शकते. स्वस्तात कर्जासह या खात्यावर सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळू शकता. हे बँक खाते त्यांच्यासह कुटुंबाला वरदान ठरेल.

घरातील महिलेच्या नावे उघडा येथे खाते, तुमचा असा होईल मोठा फायदा
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 2:12 PM

नवी दिल्ली | 8 March 2024 : आज जागतिक महिला दिन (International Women Day) आहे. बँक ऑफ बडोदाने महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. हे खाते उघडणाऱ्या महिलांना ना केवळ स्वस्तात कर्ज मिळेल, पण इतर ही अनेक सोयी-सुविधा त्यांना मिळतील. विशेष म्हणजे या खात्यत नेहमी 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवत येईल आणि तुम्हाला वाटेल तेव्हा ती काढता येईल. जर आज आई,बहिण अथवा पत्नीला गिफ्ट द्यायचे असेल तर हे खाते तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.

महिला शक्ती बचत खाते

बँकेने महिलांसाठी दोन खास बचत खाती सुरु केली आहेत. महिला शक्ती बचत खाते आणि महिला पॉवर करंट खाते. येत्या 30 जून, 2024 पर्यंत या खात्याचा फायदा घेता येऊ शकतो. खाते उघडता येऊ शकते. या खातेदारांना बँकेकडून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. यामध्ये 25 लाख रुपयांच्या ओवरड्राफ्टची सुविधा आहे.

हे सुद्धा वाचा

इतर काय काय फायदे मिळतील

या बँकेत खाते उघडणाऱ्या महिलांना सर्व प्रकारच्य सुविधा मिळतील. कर्जावर 25 आधार अंक म्हणजे 0.25 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज मिळेल. तर दुचाकीसाठी पण 0.25 टक्क्यांपर्यंत कमी, शैक्षणिक कर्जावर 0.15 टक्के, कार आणि गृहकर्जावर 0.10 टक्के दराने व्याज मिळेल. बँकेचे प्रक्रिया शुल्क पण माफ होईल. तर बँकेच्या लॉकर सुविधेवर वार्षिक 50 टक्क्यांची सवलत मिळेल. या खात्यामुळे महिला सदस्याच्या नावे वाहन कर्ज, गृह कर्ज घेतल्यास मोठी सवलत मिळेल. त्यामुळे तुमची मोठी बचत होईल. कर्जावरील हप्ता कमी होईल. तसेच कमी व्याजदराने पण मोठी बचत होईल. प्रक्रिया शुल्क वाचेल. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा पण फायदा घेता येईल.

  • सर्व प्रकारच्या कर्जावर 0.25 टक्क्यांपर्यंत व्याजावर सवलत
  • सर्व प्रकारच्या कर्जावर प्रक्रिया शुल्क माफ
  • बँक लॉकरवर वार्षिक 50 टक्क्यांची सवलत
  • रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर विमा मोफत, 2 लाखांपर्यंत विमा
  • प्रत्येक तिमाहीत एअरपोर्ट लाऊंजची सुविधा
  • वार्षिक 30 चेकची कॉपी मोफत
  • रोजच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कम जमा करण्यावर शुल्क नाही.
  • इतर ही अनेक सुविधा
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.