हा शेअर खरेदी करण्यासाठी महिन्याचा पगार पण कमी; अंडरविअर विकून ही कंपनी झाली मालामाल, आता दिला 120 रुपयांचा बोनस

Share Market : आमिर खान यांचा चित्रपट लाल सिंह चड्ढा याची बनियन तयार करण्याची गोष्ट तर तुम्ही रुपेरी पडद्यावर पाहिली असेल. भारतात 12 महिने बनियन आणि अंडरविअरची मागणी असते. या श्रेणीतील या कंपनीने या उत्पदानातून मोठी कमाई केली आहे.

हा शेअर खरेदी करण्यासाठी महिन्याचा पगार पण कमी; अंडरविअर विकून ही कंपनी झाली मालामाल, आता दिला 120 रुपयांचा बोनस
गुंतवणूकदार पण मालामाल
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 9:25 AM

भारतात अंडरविअर आणि बनियनचे मोठे मार्केट आहे. या क्षेत्रातील लोकल ब्रँडपासून तर अनेक जागतिक ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी गावाकडील आठवडी बाजारातही चांगल्या ब्रँड्सचे अंडरविअर आणि बनियन विक्रीला असते. भारत अंडरगारमेंटची मोठी बाजारपेठे आहे. त्यात अनेक लोकप्रिय ब्रँड आहेत. ते केवळ नावावरच कमाई करतात. आता या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 120 रुपयांचा बोनस देण्याचे जाहिर केले आहे. पण या कंपनीचा शेअर खरेदी करणे सोपे नाही. त्यासाठी महिन्याचा पगार पण कमी पडेल.

Page Industry ची कमाल

तर ही कंपनी आहे पेज इंडस्ट्रीज. ती भारतात ‘जॉकी’ ब्रँड नावाने अंडरगारमेंट तयार करण्याचे काम करते. जॉकी ब्रँडचे उत्पादन ही कंपनी मोठ्या प्रमाणात करते. कंपनीने नुकताच या आर्थिक वर्षातील 2023-24 मधील चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. त्यानुसार कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 120 रुपयांचा लाभांश (Dividend) देणार आहे.

हे सुद्धा वाचा

जॉकी आणि पेज इंडस्ट्रीजचे कनेक्शन

  • भारतात जॉकी अंडरविअरची खूप क्रेज आहे. भारतात पेज इंडस्ट्रीज लिमिटेड ही अंडरविअर तयार करते. या कंपनीची सुरुवात 1994 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी भारतासह श्रीलंका, बांगलादेश आणि इतर दक्षिण आशियातील देशांमध्ये हा ब्रँड पोहचवते.
  • देशभरात जॉकीचे 200 हून अधिक वितरक आहेत. तर 25,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचे जाळे आहे. सुरुवातीला या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 6 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. आता लाभांशाची रक्कम 120 रुपये इतकी आहे.

किती आहे शेअरची किंमत

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, जानेवारी-मार्चमधील चौथ्या तिमाहीत कंपनीला 108.2 कोटींचा नफा झाला. तर कंपनीला एकूण 3.2 टक्क्यांचा महसूल मिळाला. आता महसूल 995.3 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 35,650 रुपये आहे.

कधी मिळेल लाभांशाचा पैसा ?

पेज इंडस्ट्रीजने लाभांश देण्यासाठीची रेकॉर्ड डेट 31 मे निश्चित केली आहे. तर गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांशाची रक्कम 22 जून रोजी येईल. यापूर्वी पेज इंडस्ट्रीजने 2007 पासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना 65 वेळा लाभांश दिला. फेब्रुवारी 2024 मध्ये पेज इंडस्ट्रीजने 100 रुपयांचा लाभांश दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.