Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Aadhaar : आधारविना पॅनकार्ड होईल निष्क्रिय, या तारखेपूर्वीच तातडीने करा दोन्ही कार्ड लिंक

Pan Aadhaar : आधार कार्डशी पॅनकार्ड जोडले नाहीतर ते निष्क्रिय होईल..

Pan Aadhaar : आधारविना पॅनकार्ड होईल निष्क्रिय, या तारखेपूर्वीच तातडीने करा दोन्ही कार्ड लिंक
तर बसेल फटकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 6:50 PM

नवी दिल्ली : गेल्या वर्षाच्या डिसेंबरपासूनच आधार कार्ड– पॅन कार्ड जोडणीसंदर्भात (Aadhaar Card- Pan Card Linking) अनेकदा जनतेला सूचना देण्यात आल्या. त्यानंतर एक तारीखही निश्चित करण्यात आली. त्यानंतर लिकिंग न करणाऱ्यांना सशुल्क मुदतवाढ (Paid Extensions) देण्यात आली. आता ही सशुल्क मुदतवाढही संपत आली आहे. या तारखेनंतर तुम्हाला आधार आणि पॅन एकमेकांशी लिंक करता येणार नाही. त्यामुळे तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) शुक्रवारी याविषयीची सूचना दिली आहे. त्यानुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत ही प्रक्रिया न पूर्ण केल्यास अशा व्यक्तींचे पॅन कार्ड निष्क्रिय ठरविण्यात येईल.

आयकर खात्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार आधार कार्ड-पॅनकार्ड यांची जोडणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्वच पॅनकार्ड धारकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 31 मार्च 2023 पूर्वीच आधारकार्ड-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये एक अधिसूचना प्रकाशित केली होती. त्यामध्ये आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय येथील नागरिकांना या प्रक्रियेतून सूट देण्यात आली होती. जे भारताचे नागरिक नाहीत. ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांनाही या श्रेणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा 30 मार्च रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक अधिसूचना काढली होती. त्यात एकदा पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर आयकर कायद्यानुसार त्याच्याविरोधात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे करदात्यांसमोर तर मोठे संकट उभे ठाकणार आहे.

पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते प्राप्तिकर रिटर्न जमा करु शकणार नाहीत. तसेच त्यांना थकबाकीचीही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. रिटर्नमध्ये त्रुटी असेल तर ती पूर्ण करता येणार नाही. तसेच कर कपातही जादा दराने होईल.

म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अथवा बँकेतील खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. ते निष्क्रिय झाल्यास या सेवा मिळणार नाहीत. बंद झालेल्या पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार नाही. असा प्रयत्न केल्यास तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.