पॅन कार्ड नाही तर हे व्यवहार कसे करणार? तुमचं काम मध्येच अडकणार

Pan Card | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅनकार्डविषयी काही मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. पॅन कार्ड आयकर विभागाकडून देण्यात येते. त्यात 10 अंकांचा अल्फान्युमेरिक युनिककोड असतो. त्यामुळे दोन करदात्यांचा पॅन कधी एकसारखा होत नाही. या ठिकाणी त्याचा वापर होतो.

पॅन कार्ड नाही तर हे व्यवहार कसे करणार? तुमचं काम मध्येच अडकणार
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 5:38 PM

नवी दिल्ली | 19 March 2024 : दररोजच्या जीवनात पॅनकार्डला अत्यंत महत्व आहे. हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. अनेक व्यवहारासठी पॅनची गरज पडते. पॅनकार्ड अनिवार्य आहे. एका निश्चित मर्यादेनंतर व्यवहारासाठी पॅनकार्डची गरज पडते. तुमच्याकडून पॅनकार्ड क्रमांक अथवा त्याची फोटोकॉपी घेण्यात येते. मोठ्या रक्कमेसाठी तुम्ही पॅनकार्ड दिले नाही तर तुमचा व्यवहार थांबविल्या जाऊ शकतो. पॅनची पूर्तता झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडाळाने त्यासाठी निर्धारीत मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. पॅन कार्ड हे आयकर खाते नागरिकांना देते. यामध्ये 10 अंकांचा अल्फान्युमेरिक युनिककोड असतो. तुम्ही पॅनकार्डसाठी जेव्हा अर्ज करता, तेव्हा तुम्हाल एक विशिष्ट 10-अंकांची ओळख संख्या एका लिमिनेटेड प्लास्टिक कार्डवर अंकित करुन देण्यात येते. दोन करदात्यांचा पॅन कार्डवरील क्रमांक कधीच एकसारखा नसतो. अनेक कामासाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे आहे. खासकरुन आर्थिक व्यवहारासाठी पॅनचा अधिक वापर होतो.

यासाठी पॅन कार्ड एकप्रकारे अनिवार्यच आहे

  1. दुचाकी सोडून इतर वाहनांच्या विक्री वा खरेदीसाठी
  2. एका निश्चित काळातील बँकेच्या बचतीवर, सहकारी खात्यातील मुदतीच्या बचतीसाठी
  3. क्रेडिट वा डेबिट कार्डसाठी अर्ज करताना
  4. सेबीच्या नियंत्रणाखालील ब्रोकर्स, संस्था, एजंटकडून डीमॅट खाते उघडण्यासाठी
  5. हॉटेल अथवा रेस्तरांमधील 50,000 रुपयांपेक्षा अधिकचे एकरक्कमी बिल अदा करण्यासाठी
  6. परदेशी यात्रा, परदेशी चलन खरेदीसाठी 50,000 रुपयांपेक्षा अधिकची एकरक्कमी व्यवहार
  7. म्युच्युअल फंड योजनेत युनिट खरेदीसाठी 50,000 रुपयांहून अधिकचा खर्च
  8. आरबीआयकडून बाँड खरेदी करताना 50,000 रुपये वा अधिकचा खर्च
  9. सहकारी बँकेसह इतर कोणत्याही बँकेत एकाच दिवशी 50,000 हजारांहून अधिकचा व्यवहार
  10. बँक ड्राफ्ट वा इतर व्यवहारासाठी एक दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जादा रोख
  11. कोणतीही बँकिंग कंपनी, गैर-बॅकिंग वित्तीय कंपनी, सहकारी बँक, पोस्ट ऑफिसमध्ये एका आर्थिक वर्षात 50,000 रुपये वा एकूण 5 लाखांपर्यंतची जमा रक्कम
  12. एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांहून अधिकचा जीवन विमा हप्ता
  13. शेअर खरेदी विक्रीसाठी 1 लाख रुपये अथवा त्यापेक्षा अधिकचा खर्च
  14. कोणतीही अचल संपत्ती विक्री वा खरेदीसाठी 10 लाख वा अधिकचा खर्च
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.