Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parle-G : देशात तर अवघ्या 5 रुपयांना, बकाल पाकिस्तानमध्ये इतकी आहे किंमत, तर अमेरिकेत कितीला मिळतो पार्ले-जीचा पुडा

Parle-G : भारतातील प्रत्येक घरात पार्लेजीचे बिस्किट लोकप्रिय आहे. पार्लेजीचे विविध बिस्किट आहेत. भारतासह जगभरात हे बिस्किट आवडीनं खाल्या जाते. बकाल पाकिस्तानमध्ये आणि श्रीमंत अमेरिकेत या बिस्किटाची काय किंमत आहे माहिती आहे का

Parle-G : देशात तर अवघ्या 5 रुपयांना, बकाल पाकिस्तानमध्ये इतकी आहे किंमत, तर अमेरिकेत कितीला मिळतो पार्ले-जीचा पुडा
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 6:41 PM

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक घरात पार्लेजीचं बिस्किट (Parle-G Biscuit) लोकप्रिय आहेच. पार्लेजीविषयी प्रत्येकाची एक आठवण आहे. या बिस्किटाचे चाहते कमी नाहीत. गरीब असो की श्रीमंत प्रत्येक जण हे बिस्किट चवीने खातो. प्रत्येक वर्गातील व्यक्ती या बिस्किटाची चाहती आहे. अनेकांची सकाळ चहा आणि Parle-G बिस्टिकाशिवाय पूर्ण होत नाही. अत्यंत स्वस्त आणि स्वादिष्ट बिस्किट म्हणून भारतीय समाजात पार्लेजीला महत्व आहे. जगभरात पार्लेजी बिस्किट आवडीने फस्त केल्या जाते. अमेरिकेतही या बिस्किटाचे कमी चाहते नाहीत. पाकिस्तानमध्ये पण हे बिस्किट लोकप्रिय आहे. या देशात या बिस्किटाची काय किंमत (Parle-G Biscuit Price) आहे, जाणून घ्या..

मुंबईतून झाला श्रीगणेशा पार्लेजीची सुरुवात मुंबईतील विले पारले या भागातून झाला. एका बंद पडलेल्या फॅक्टरीतून हा लोकप्रिय ब्रँड तयार झाला. 1929 मध्ये व्यापारी मोहनलाल दयाल यांनी ही बंद पडलेली फॅक्टरी खरेदी केली. त्यानंतर पार्ले नावाने ब्रँडची सुरुवात झाली. 1938 मध्ये पार्ले-ग्‍लूको (Parle-Gloco) नावाने बिस्किटाचे उत्पादन सुरु करण्यात आले.

बंद झाले उत्पादन पार्ले-जीचं (Parle-G) नाव ग्लूको बिस्किट होते. स्वातंत्र्यानंतर या बिस्किटाचे उत्पादन बंद झाले. त्यावेळी देशावर अन्नधान्याच्या टंचाईचे संकट ओढावले होते. कारण बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर होत होता. गव्हाचे उत्पादनच कमी असल्याने आणि इतर देशातून गव्हाचा पुरवठा न झाल्यानं या बिस्किटाचे उत्पादन थांबविण्यात आले.

हे सुद्धा वाचा

यामुळे दिले Parle-G नाव पुन्हा या कंपनीने उत्पादन सुरु केले तेव्हा, बाजारात अनेक कंपन्यांनी आवाहन दिले. त्यावेळी ब्रिटानियाच्या ग्लूकोज-डी (Glucose-D) बिस्किटाने चांगला जम बसवला होता. त्यामुळे कंपनीने ग्लूको बिस्किटाचे नाव ‘Pagle-G’ असे बदलवून हे बिस्किट पुन्हा बाजारात उतरवले.

या ‘G’ चा अर्थ तरी काय 1980 नंतर पार्ले ग्लूको बिस्किट छोटे करण्यात आले. या कंपनीचे नाव पार्ले-जी करण्यात आले. 2000 मध्ये कंपनीने ‘G’ अर्थ ‘Genius’ या टॅगलाईनचा वापर करत बिस्किटाला बाजारात उतरवले. पण खरं पाहता Parle-G मधील ‘G’ अर्थ ‘ग्लूकोज’ असाच आहे.

अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये किंमत किती? भारतात पार्लेजीच्या 5 रुपयांच्या पॅकेटचे वजन 65g आहे. तर एका अहवालानुसार, अमेरिकेतील 1 डॉलरच्या पार्ले जीचे 56.5g चे 8 पॅक येतात. या हिशोबाने विचार करता, हा पुडा 10 रुपयांच्या जवळपास मिळतो. याशिवाय आपल्या शेजारील देशाचा विचार करता, भारतात 5 रुपयांत मिळणारा पार्लेजीचा पुडा, आर्थिक संकटातून जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये 50 रुपयांना विक्री होत आहे. Grocer App नुसार, पार्लेजीच्या 79g पॅकची किंमत 20 रुपये आहे. भारताच्या बाहेर हे बिस्किट महाग मिळत आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.