पतंजली बिस्किटचा व्यवसाय लवकरच रुचि सोयाच्या हाती, इतक्या कोटींचा होत आहे सौदा

रुचि सोया इंडस्ट्रीजने पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (PNBPL)सोबत मंगळवारी 60.02 कोटींचा करार केला आहे. यात कंपनीच्या संचालक मंडळाने पीएनबीपीएलबरोबरच्या या करारासंदर्भात व्यवसाय हस्तांतर करारावर (BTA) स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. (Patanjali Biscuit's business is soon in the hands of Ruchi Soya, a deal worth so many crores)

पतंजली बिस्किटचा व्यवसाय लवकरच रुचि सोयाच्या हाती, इतक्या कोटींचा होत आहे सौदा
पतंजली बिस्किटचा व्यवसाय लवकरच रुचि सोयाच्या हाती
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 9:35 PM

नवी दिल्ली : भारतातील खाद्यतेलांची सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाणारी रुचि सोया लवकरच बाबा रामदेव यांच्या पतंजली बिस्किटांचा व्यवसाय घेईल. यासाठी रुचि सोया इंडस्ट्रीजने पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (PNBPL)सोबत मंगळवारी 60.02 कोटींचा करार केला आहे. यात कंपनीच्या संचालक मंडळाने पीएनबीपीएलबरोबरच्या या करारासंदर्भात व्यवसाय हस्तांतर करारावर (BTA) स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत हे अधिग्रहण पूर्ण होईल. (Patanjali Biscuit’s business is soon in the hands of Ruchi Soya, a deal worth so many crores)

कंपनीच्या विद्यमान व्यवसायाच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करणे हा अधिग्रहण करण्याचा हेतू आहे. या करारामुळे एफएमसीजी क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यास मदत होईल, असे रुचि सोया इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे. प्रतिस्पर्धी व्यवस्थेसाठी रुची सोया आणि पीएनबीपीएलमधील हा करार आहे. त्याअंतर्गत, पतंजली आयुर्वेद लिमिटेडसह पीएनबीपीएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या थेट बिस्किट्सच्या कोणत्याही स्पर्धात्मक व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रवेश करू शकत नाहीत.

दोन हप्त्यांमध्ये होईल पेमेंट

करारा अंतर्गत देय रक्कम दोन हप्त्यांमध्ये असेल. पहिला हफ्ता 15 कोटींचा एकूण खरेदीचा विचार देय म्हणून अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी केला जाईल. तर उर्वरित 45.01 कोटी रुपयांचा हफ्ता 90 दिवसांत देण्यात येईल. पीएनबीपीएलची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 448 कोटी रुपये आहे.

2019 मध्ये पतंजली आयुर्वेदने खरेदी केली होती रुची सोया

भारतातील रुचि सोया उत्पादन हे सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिक यासारख्या ब्रँडचा त्यात समावेश आहे. रुचि सोया एके काळी कर्जात बुडाली होती. अशा परिस्थितीत पंतजली आयुर्वेदने वर्ष 2019 मध्ये ती खरेदी केली होती. यासाठी स्वत: पतंजली यांना 3200 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. पतंजली यांनी एसबीआयकडून 1200 कोटी, सिंडिकेट बँकेकडून 400 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 700 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 600 कोटी रुपये आणि अलाहाबाद बँकेकडून 300 कोटी कर्ज घेतले होते. (Patanjali Biscuit’s business is soon in the hands of Ruchi Soya, a deal worth so many crores)

इतर बातम्या

नाकात ऑक्सिजनची नळी, उरात रुग्णसेवेची बांधिलकी; श्रीनगरच्या वाहनचालकाचा महामारीत अनोखा आदर्श

काँग्रेसचा पराभव का झाला?, अशोक चव्हाण करणार देशभरातील निकालाची समीक्षा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.