Patanjali Foods Share : योगगुरु रामदेव बाबा यांचं फायद्याचं ‘आसन’, कमाईचा साधता येईल ‘योग’!

Patanjali Foods Share : योगगुरु बाबा रामदेव यांच्याकडून अनेक जण योग शिकतात. तोही मोफत. तर आता पतंजलीचा फूड शेअर तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे. ऑफर फॉर सेल मध्ये प्रमोटर्स त्यांची हिस्सेदारी कमी करणार आहेत. त्यामुळेच शेअर स्वस्तात देण्याचा प्रस्ताव आहे.

Patanjali Foods Share : योगगुरु रामदेव बाबा यांचं फायद्याचं 'आसन', कमाईचा साधता येईल 'योग'!
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : पतंजली योगच्या (Patanjali Yog) माध्यमातून जगभरात कोट्यवधी लोक मोफत योग शिकत आहेत. योगगुरु रामदेव बाब त्यासाठी नवा पैसा घेत नाहीत. पण त्यांनी नफ्याची अनेक आसनं प्रत्यक्षात बाजारात उतरवली आहेत. योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्यामुळे पतंजली आज जागतिक पातळीवर पोहचले आहे. पतंजली ब्रँडच्या नावाखाली त्यांनी आयुर्वेदिकच नाही तर एफएमसीजी उद्योगात पण आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना पतंजली फूड्स लिमिटेडने (Patanjali Foods Limited) कमाईचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. ऑफर फॉर सेल मध्ये प्रमोटर्स त्यांची हिस्सेदारी कमी करणार आहेत. त्यामुळे पतंजलीचा शेअर स्वस्तात मिळेल. गुंतवणूकदारांना कमाईचा योग साधता येणार आहे.

किती टक्के हिस्सा विक्री पतंजली फूड्स नवीन ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएस(OFS) घेऊन आले आहे. या ऑफरनुसार प्रमोटर्स कंपनीतीली त्यांची हिस्सेदारी कमी करणार आहेत. ते पतंजली आयुर्वेद लिमिटेडमधील त्यांचा जवळपास 7 टक्के हिस्सा विक्री करणार आहेत. पंतजली फुड्स लिमिटेडच्या 2.53 कोटी शेअरच्या बरोबर हा वाटा आहे.

कारण काय पतंजली फुड्स लिमिटेडचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले होते. नियमांचे उल्लंघनामुळे भविष्यात कोणतीही कारवाई होऊ नये, याची खबरदारी ही कंपनी घेत आहे. त्यासाठी प्रमोटर्सनी त्यांचा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. ते 7 टक्क्यांच्या घरात वाटा विक्री करतील.

हे सुद्धा वाचा

सवलतीवर शेअर पतंजली फूड्स खाद्य तेल आणि अन्य खाद्य उत्पादन तयार करते. या कंपनीची गणना सध्या एफएमसीजी कंपन्यांमध्ये करण्यात येते. कंपनीने या ओएफएससाठी कमीत कमी 1,000 रुपये प्रति शेअर इतकी ठेवली आहे. तर बीएसईवर बुधवारी पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली. हा शेअर 1,228.05 रुपयांवर बंद झाला. रामदेव बाबा यांच्या कंपनीच्या शेअरवर 18.36 टक्के सवलत मिळत आहे.

अधिकच्या शेअरची विक्री पतंजली फूड्सनुसार, ही ऑफर सध्या केवळ दोन दिवसांसाठी आहे. कंपनीचा ओएफएस 13 जुलै म्हणजे आज उघडेल आणि उद्या 14 जुलै रोजी बंद होईल. पतंजली फूड्स या ऑफरमधून कमीत कमी 2,530 कोटी रुपये गोळा करणार आहे. पतंजली फूड्सनुसार, ओएफएस मध्ये 2-2 रुपये मूल्याचे 25,339,640 शेअर्स आणण्यात येतील. तसेच 7,239,897 अतिरिक्त शेअर विक्री करण्याचा नियम आहे. जर हे अतिरिक्त शेअर विक्री केली तर प्रमोटर्सची हिस्सेदारी 9 टक्क्यांपेक्षा कमी होईल.

कंपनीचा सध्याचा शेअरहोल्डिंग पॅटर्न काय सध्या पतंजली फूड्सचे बाजारातील भांडवल 44,454.78 कोटी रुपये आहे. यामध्ये प्रमोटर कंपनी पतंजली आयुर्वेदजवळ 14,25,00,000 शेअर्स म्हणजे 39.37 टक्के हिस्सेदारी आहे. पतंजली फूड्समध्ये सर्वच प्रमोटर्सकडे 29,25,76,299 शेअर्स म्हणजे 80.82 टक्के हिस्सेदारी आहे. सध्याच्या नियमानुसार, कोणत्याही सार्वजनिक सूचीबद्ध कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी 75 टक्क्यांहून अधिक नसावी.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.