Patanjali : रुची सोया होणार ‘पतंजली फूड्स’! कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाची मान्यता, रुची सोयाच्या शेअर्समध्ये वाढ
रुची सोया इंडस्ट्रीज पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या खाद्य व्यवसायाचे विलिनीकरण करण्याचा विचार करत आहे. रुची सोयाने अलीकडेच फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO)द्वारे 4 हजार 300 कोटी रुपये उभे केले होते. दरम्यान, रामदेव बाबा यांच्या पनी रुचा सोयाचे नाव लवकरच बदलणार आहे. याचा परिणाम शेअर्सवरही दिसून आला.

मुंबई : रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या नेतृत्वाखालील रुची सोया इंडस्ट्रीज पतंजली (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडच्या खाद्य व्यवसायाचे विलिनीकरण करण्याचा विचार करत आहे . रुची सोयाने सांगितले की, ‘ ते यासाठी सर्वोत्तम निर्णय घेऊन चांगल्या दृष्टिकोनाचे मूल्यांकन करणार आहे. तसेच, कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ रुची सोयाने अलीकडेच फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) द्वारे 4 हजार 300 कोटी रुपये उभे केले होते. दरम्यान, रामदेव बाबा यांच्या कंपनी रुचा सोयाचे नाव लवकरच बदलणार आहे. याचा परिणाम शेअर्शमध्येही झाला आहे. रुची सोयाच्या संचालक मंडळाने रुची सोया इंडस्ट्रीजचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड, असे करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजकडे (stock exchange) अर्ज दाखल केला आहे. यानंतर कंपनीने संचालक मंडळाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामुळे रुचा सोयाच्या शेअर्समध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे.
रुची सोयानं नेमकं काय म्हटलंय?
रुची सोया यांनी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या खाद्य व्यवसायाचे विलिनीकरण करण्याच्या सर्वोत्तम मार्गाचे मूल्यमापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. बोर्डाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रस्तावित कराराच्या अटी आणि शर्तींवर वाटाघाटी करण्यासाठी अंतिम रूप देण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी अधिकृत केले. मंडळाने कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड किंवा अन्य कोणतेही नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय बदल होणार?
पतंजलीने 2019 मध्ये रुची सोया विकत घेतली होती. पतंजली आयुर्वेद नॉन-फूड, पारंपारिक औषध आणि वेलनेस क्षेत्रात काम करेल. पतंजली समूहाने 2019 मध्ये रुची सोयाला दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे 4 हजार 350 कोटी रुपयांना विकत घेतले होते. कंपनीची संचालक मंडळाची बैठक 10 एप्रिलला झाली. यावेळी पतंजली आयुर्वेद लि.च्या फूड पोर्टफोलिओशी ताळमेळ वाढवण्याच्या सर्वात कार्यक्षम मार्गाचे मूल्यमापन करण्यासाठी संचालकांनी त्यांची तत्वतः मान्यता दिली आहे. रुची सोयाने कंपनीच्या अधिकार्यांना प्रस्तावित व्यवहाराच्या अटी व शर्तींची वाटाघाटी, अंतिम रूप देणे, अंमलात आणणे आणि वितरित करण्याचे अधिकार दिले आहेत.
रुची सोयाच्या शेअर्समध्ये वाढ
ही विलिनीकरणाची बातमी समोर येताच रुची सोयाच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ होत आहे. रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 5.24 टक्क्यांच्या वाढीसह 972 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आज सकाळी हा शेअर ट्रेडिंगच्या सुरुवातीला 969 रुपयांवर उघडला आणि 999.45 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर गेला. उल्लेखनीय म्हणजे रुची सोयाने 650 रुपयांच्या किमतीत FPO (फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग) आणले होते. त्या पातळीवर, रुची सोयाच्या स्टॉकने त्यांच्या गुंतवणूकदारांना 49 टक्के परतावा दिला आहे.
इतर बातम्या
बुलढाणा जिल्ह्यात आजपासून लोडशेडिंग; तर जिल्हा परिषदेमध्ये विजेचा अपव्यय सर्व दिवे सुरुच
SRH vs GT Live Score, IPL 2022: SRH ने टॉस जिंकला, गुजरातची पहिली फलंदाजी
Photo Gallery | अभिनेत्री हीना खानने कुठल्या वाळवंटात घालवली सुट्टी ; घ्या जाणून