Patanjali Foods FPO : पतंजलीची लॉटरी! एप्रिल महिन्यात रामदेव बाबांमुळे होईल बंपर कमाई
Patanjali Foods FPO : रामदेव बाबा यांच्या पतंजलीची लवकरच गुंतवणूकदारांना लॉटरी लागणार आहे. पतंजलीचा एफपीओ एप्रिल महिन्यात बाजारात दाखल होत आहे. पतंजली हा भारतातील रिटेल क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड ठरला आहे. त्यामुळे या गुंतवणूकदार आता काय प्रतिसाद देतो, हे लवकरच समोर येईल.
नवी दिल्ली : पतंजली फूड्स लिमिटेडने (Patanjali Foods Limited) कमाईचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीची लवकरच गुंतवणूकदारांना लॉटरी लागणार आहे. पतंजलीचा एफपीओ एप्रिल महिन्यात बाजारात दाखल होत आहे. पतंजली हा भारतातील रिटेल क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड ठरला आहे. पतंजली गुंतवणूकदारांसाठी फॉलो ऑन पब्लिक इश्यू (FPO) घेऊन येत आहे. या घडामोडींपूर्वी बाजारात पतंजलीविषयी मोठी घडामोड घडलेली आहे. पंतजली फूड्सच्या प्रमोटर्स शेअरच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. पण याचा या एफपीओच्या उलाढालीवर परिणाम होणार नसल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला आहे. शेअर बाजारात कारवाई झाली असली तरी एफपीओविषयी पतंजली समूहाला मोठी आशा आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील हिस्सेदारी वाढवण्यासाठी, हा वाटा 25 टक्के करण्यासाठी एप्रिल महिन्यात फॉलो ऑन पब्लिक इश्यू (FPO) आणला जात आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने(NSE) आणि बीएसई निर्देशकांने (BSE Index) रामदेव बाबांच्या पंतजली समूहाच्या पतंजली फूड्सच्या प्रमोटर्सचे शेअर जप्त केले होते. ही कंपनी प्रामुख्याने खाद्यतेल उत्पादन करते. मध्यंतरी शेअर बाजारात हा समूह जबरदस्त फॉर्ममध्ये होतो. पण नंतर या वर्षी जानेवारी महिन्यात या शेअर्सचे पानिपत झाले.
रामदेव बाबा यांनी वृत्तसंस्था पीटीआय-भाषा यांना या नवीन प्रयोगाबद्दल माहिती दिली. या नवीन घडामोडींमुळे पतंजली फूड्स लिमिटेडच्या कामकाजावर अथवा आर्थिक प्रगतीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचा दावा रामेदव बाबा यांनी केला आहे. गुंतवणूकदार आणि सार्वजनिक शेअरधारकांना त्यांनी हा विश्वास दिला. सेबीच्या मार्गदर्शक सूचनानुसार, प्रमोटर्सच्या शेअर उलाढालीवर 8 एप्रिल 2023 पर्यंत रोख लावण्यात आली आहे. त्याचा परिणाम दिसणार नाही.
सध्या बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे एफपीओ उशीराने बाजारात आणण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात हा एफपीओ बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरु होईल. भारतीय आणि परदेशातील अनेक गुंतवणूकदार पीएफएलमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. पंतजली समूह पीएफएलच्या प्रक्रियेसाठी अनुकूल आहे. पतंजली जवळपास 6 टक्क्यांच्या बरोबरीत हा इश्यू आणत आहे.
पतंजली फूड्स लिमिटेडने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या प्रमोटर्सच्या शेअरच्या व्यवहारांवर बीएसई आणि एनएसई यांनी रोख लावली आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेड, आचार्य बालकृष्ण, पतंजली परिवहन आणि पतंजली ग्रामोद्योग न्यास सहीत इतर 21 प्रमोटर्स यूनिट्सच्या शेअरवर ही कारवाई करण्यात आली होती. मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे ही रोख लावण्यात आली.
आचार्य बालकृष्ण पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठ हरिद्वारचे सह संस्थापक आहेत. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957 च्या नियम 19A (5) अंतर्गत, सूचीबद्ध युनिटने किमान 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग धारण करणे आवश्यक आहे.परंतु, मार्च 2022 मध्ये FPO आल्यानंतर, किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग 19.18 टक्क्यांपर्यंत वाढले. नियमानुसार 25 टक्क्यांपेक्षा हे 5.82 टक्के कमी आहे.