WhatsApp Paid Service | WhatsApp, Instagram आणि Facebook वापरासाठी मोजा पैसे, काय आहे कंपनीचा प्लॅन?

WhatsApp Paid Service | WhatsApp, Instagram आणि Facebook वर आपण तात्काळ भावना, मतं आणि विचार मांडतो. त्याला कुठलेच आणि कसलंच बंधन नाही. पण आता लवकरच तुम्हालाच स्वतःवर बंधन घालण्याची वेळ येणार आहे. कारण या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी लवकरच पैसे मोजावे लागू शकतात.

WhatsApp Paid Service | WhatsApp, Instagram आणि Facebook वापरासाठी मोजा पैसे, काय आहे कंपनीचा प्लॅन?
आता मोजा पैसाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 10:59 AM

WhatsApp Paid Service | WhatsApp, Instagram आणि Facebook वर आपण तात्काळ भावना, मतं आणि विचार मांडतो. त्याला कुठलेच आणि कसलंच बंधन नाही. पण आता लवकरच तुम्हालाच स्वतःवर बंधन घालण्याची वेळ येणार आहे. कारण या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी लवकरच पैसे मोजावे लागू शकतात. मेटा (Meta) लवकरच वापरकर्त्यांसाठी पेड फीचर्स (Paid Features) सुरु करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियातील (Social Media) दिग्गज कंपनी एक नव्या उत्पादनाचे सेटअप करण्याची शक्यता आहे. या नवीन पेड फिचर्स युनिटचे प्रमुख प्रतिती रॉय चौधरी या आहेत. त्या अगोदर मेटाच्या संशोधन युनिटच्या हेड राहिल्या आहेत. Snap आणि Twitter ने यापूर्वीच पेड इन सेवा यापूर्वीच सुरु केल्या आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना Twitter Blue आणि Snapchat+ या सेवांचा लाभ मिळतो. एवढेच नाहीतर युजर्संना हे सोशल माध्यम विशेष सेवाही (Exclusive Services) प्रदान करते.

काय आहे प्लॅन?

The Verge ने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, मेटा पेड फिचरसाठी वेगळा विभाग सुरु करत आहे. New Monetization Experiences या नावाने हा विभाग असेल. WhatsApp, Instagram आणि Facebook मधून महसूल गोळा करण्याची जबाबदारी या विभागाची असेल. या टीमची जबाबदारी युनिट प्रमुख प्रतिती रॉय चौधरी यांच्या खाद्यांवर असेल. कंपनीच्या आंतरिक पत्रव्यवहारातून अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पेड सर्व्हिसची चर्चा काही पहिल्यांदाच रंगली नाही. यापूर्वी ही सोशल मीडिया अॅपवर पैसे देऊन सेवा सुरु करण्याच्या चर्चांनी वाचकांचे लक्ष वेधले होते. ही पेड सेवा कशी असेल याविषयीची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही.

कंपनीचा जाहिरातीवर जोर

कंपनी जाहिरात खेचून आणण्यावर भर देत आहे. जाहिरात व्यवसायवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या युजर्सकडून पैसे घेण्याचा कोणताही विचार नाही. एका मुलाखतीत व्यवसाय आणि जाहिरात विभागाचे प्रमुख John Hegeman यांनी कंपनीची धोरणं स्पष्ट केली. त्यात जाहिरात व्यवसाय वाढीवर लक्ष वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

डिजिटल अॅड्समधून कमाई

Snap, Twitter, Meta यांच्या महसुलातील मोठा हिस्सा हा डिजिटल जाहिरातींमधून येतो. पेड फिचर्सच्या माध्यमातून कंपनी जाहिरातीविनाही कमाई करु शकते. हा कमाईचा नवीन मार्ग असेल. Snapआणि Twitter च्या युजर्संना काही सेवांसाठी पैसे मोजावे लागतात.

Twitter च्या नोंदणीकृत सेवांसाठी नोंदणी केल्यानंतर ट्विटर ब्लू सेवा मिळते. त्यासाठी वापरकर्त्याला 4.99 डॉलर म्हणजे 400 रुपये प्रत्येक महिन्याला मोजावे लागतात. तर Snapchat+ च्या सेवांसाठी युजर्सला 49 रुपये सेवा शुल्क प्रत्येक महिन्याला द्यावे लागते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.