Gautam Adani : कर्मचाऱ्यांपेक्षा घेतात पगार कमी; किती गौतम अदानींची सॅलरी, कोण करतो अधिक कमाई

Gautam Adani Salary : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना 9.26 कोटींचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक आहे. कोणाची आहे जास्त कमाई?

Gautam Adani : कर्मचाऱ्यांपेक्षा घेतात पगार कमी; किती गौतम अदानींची सॅलरी, कोण करतो अधिक कमाई
गौतम अदानी यांची घौडदौड
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 4:41 PM

अदानी समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना किती वेतन असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यांच्या पगाराविषयीची माहिती समोर आली आहे. गौतम अदानी यांना आर्थिक वर्ष 2024 साठी 9.26 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यांना मिळणारे वेतन हे त्यांच्या समकक्ष इतरांपेक्षा कमी आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांपेक्षा पण त्यांचा पगार कमी आहे. एका माहितीनुसार, अदानी समूहातील 10 पैकी केवळ 2 कंपन्यांकडून पगार घेतात.

दोन कंपन्यांकडून वेतन

अदानी समूहाच्या शेअर बाजारात 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांना अदानी इंटरप्राईजेस लिमिटेडकडून आर्थिक वर्ष 2023-24 साठी 2.19 कोटी रुपयांचा पगार मिळाला. तर भत्त्यांपोटी 27 लाख रुपये मिळाले. त्यांना अदानी इंटरप्रायजेसकडून एकूण 2.46 कोटी रुपेय मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 3 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड कडून त्यांना 6.8 कोटी रुपये मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा

या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची नेटवर्थ 106 अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 12 व्या तर गौतम अदानी हे या यादीत 14 व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांचा लहान भाऊ राजेश अदानी हा 8.37 कोटी रुपये तर भाचा प्रणव अदानी हा 6.46 कोटी रुपये पगार घेतो.

त्यांचा मुलगा करण अदानी याला 3.9 कोटी रुपयांचे पॅकेज आहे. तर अदानी इंटरप्राईजेसचे विनय प्रकाश यांचा पगार 89.37 कोटी रुपये आहे. समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांना 9.45 कोटी रुपये, तर अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांना 15.25 कोटी रुपयांचा पगार मिळतो. त्यांचे वेतन गौतम अदानी यांच्यापेक्षा अधिक आहे.

मुकेश अंबानी यांचा पगार किती?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जवळपास 15 कोटी मेहनताना मिळतो. तर सुनील भारती मित्तल यांना जवळपास 16.7 कोटी रुपये, पवन मुंजाल यांना 80 कोटी रुपये, एलअँडटीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांचे वेतन गौतम अदानी यांच्यापेक्षा अधिक आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.