Payment : UPI Apps वर किती रुपयांचा करु शकता व्यवहार, Paytm, GPay, PhonePe वर कितीआहे मर्यादा?
Payment : UPI Apps वर दिवसभरात किती रुपये पाठवू शकता..
नवी दिल्ली : युपीआय पेमेंट सिस्टमने (UPI Payment System) सर्वसामान्य लोकांच्या जीवनात क्रांती आणली आहे. त्यांना सहज व्यवहार करता येत आहे. त्यांना आता रोखीत रक्कम ठेवण्याची गरज उरली नाही. सहजरित्या कोणालाही रक्कम पाठविता येते. पेमेंट करता येते. मॉल असो वा गल्लीत येणारा विक्रेता तुम्ही सहज रक्कम अदा करु शकता. सहज आणि सोप्प असल्याने युपीआय पेमेंटची लोकप्रियता वाढली आहे.
युपीआय पेमेंट अॅपवर व्यवहार मर्यादा निश्चित केली आहे. Paytm, GPay आणि PhonePe या युपीआय पेमेंट अॅपवर व्यवहाराची मर्यादा वेगवेगळी (UPI Transaction Limit)आहे. त्यामुळे त्यांची मर्यादा किती आहे हे पाहणे योग्य ठरते. तर त्यावरील व्यवहार सुलभ होईल.
युपीआय पेमेंट सिस्टमवर बँक ते बँक (Bank 2 Bank) रक्कम रियल टाइममध्ये हस्तांतरीत होते. पण व्यवहारासाठी प्रत्येक बँकेने एक व्यवहार मर्यादा घालून दिली आहे. राष्ट्रीय देयके महामडंळाने (NPCI) याविषयीच्या मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत.
युपीआयवर व्यवहाराचे स्वातंत्र्य असले तरी त्यासाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यानुसार, एका दिवशी तुम्हाला साधारणता 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. तर काही छोट्या बँकांची मर्यादा अगदी छोटी आहे. ही मर्यादा केवळ 25,000 रुपये आहे.
युपीआय पेमेंटवर पेटीएम हे लोकप्रिय अॅप आहे. या अॅपवर युपीआय पेमेंट साठी दिवसभराची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार, दिवसभरात तुम्ही एक लाख रुपयांचा व्यवहार करु शकता. तुम्ही एका दिवसात साधारणतः 20 यूपीआई पेमेंट करु शकता. तासानुसार ही लिमिट कमी जास्त होते. पण दिवसभरात एक लाखांचा व्यवहार करता येतो.
मीडिया रिपोर्टसनुसार पेटीएमवर एका तासात 20,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम हस्तांतरीत करता येत नाही. तर एका तासात साधारणपणे 5 युपीआय हस्तांतर करता येते. प्रत्येक अॅपवर ही मर्यादा वेगवेगळी आहे.
PhonePe, GPay हे ही युपीआय पेमेंट अॅप लोकप्रिय आहेत. या अॅपवरही दिवसभरात एक लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. गुगलपेवर दिवसभरात 10 व्यवहार करता येतात. तर PhonePe वर ही मर्यादा 10 अथवा 20 पर्यंत आहे.