गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका

पेटीएमच्या आयपीओमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना मोठा फटका बसला आहे. पेटीएमचा आयपीओ तब्बल 72 टक्क्यांनी कोसळला आहे. याचाच अर्थ ज्यांनी पेटीएममध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचे शंभर रुपयांपैकी फक्त 28 रुपयेच शिल्लक राहिले आहेत.

गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका
'पेटीएम' आयपीओमधील गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 5:30 AM

देशातील सर्वात मोठा आयपीओ, सगळ्यात वेगानं वाढणारी फिनटेक कंपनी, भारतातील यशस्वी स्टार्टअप कंपनी, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) चा आयपीओ (IPO) लाँच झाला त्यावेळी अशीच स्तुतीसमनं उधळली जात होती. अशाच स्तुतीसुमनाला भुरळून गुंतवणूकदारांनी IPO मध्ये पैसा गुंतवला. मात्र, आता गुंतवणूकदारांना फसगत झाल्यासारखे वाटतंय. 2150 रुपये इश्यू किंमतीचा IPO च्या किमतीत 72 टक्क्यांनी घट झालीये. म्हणजेच गुंतवणूकदारांची 100 रुपयांची गुंतवणूक (Investment) 28 रुपयांवर आलीये. IPO लॉंच झाला त्यावेळीसुद्धा मोठ्या गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमीच होता. त्यावेळी बाजारात येणाऱ्या सर्वच IPO मध्ये गुंतवणूकादांनी गुंतवणूक केली होती. मात्र, पेटीएमचा आयपीओ दोन पटही सब्सक्राईब झाला नव्हता. बहुतांश संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पेटीएमच्या IPO पासून चार हाथ लांब राहणंच पसंत केलं. मात्र, किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. याच उत्साहात लहान गुंतवणूकदारांनी तोट्यात जाणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली.

पहिल्याच दिवसापासून घसरण

शेअर बाजारात Paytm लिस्ट होताच शेअरमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी IPO गुंतवणूकदारांचे 26 टक्के नुकसान झाले. शेअरचा भाव 1568 रुपयांवर आला. ग्लोबल ब्रोकरेज कंपनी मैक्कायरीनं Paytm बिझनेस मॉडेल दिशाहीन असल्याचं म्हटलंय. तसेच शेअर अंडरपरफॉर्मर असल्याचं सांगत शेअर्सची किंमत 1200 रुपये ठरवली होती. ही किंमत इश्यू किंमतीच्या 44 टक्के कमी होती. पहिल्याच दिवशी Paytm चे शेअर्स विकत घेतलेले गुंतवणूकदार कमी नुकसान सहन करत IPO मधून बाहेर पडले. मात्र, ज्या गुंतवणूकदारांकडे अद्यापपर्यंत Paytm चे शेअर्स आहेत. त्यांचं मोठं नुकसान झालंय. मंगळवारी पेटीएमचे शेअर्स 584 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. सोशल मीडियावरही Paytm च्या शेअर्सची मस्करी करण्यात येत आहे. पेटीएमच्या पॅरंट कंपनीचे नाव One97 आहे. ब्रोकरेज कंपनी मैक्कायरीने Paytm चे टार्गेट दर 450 रुपयांपर्यंत निश्चित केले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील त्रैमासिक निकालात कंपनीचे 780 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

पेटीएमला आरबीआयकडून देखील झटका

शेअर बाजारात पेटीएमची घसरण सुरू असतानाच कंपनीसाठी आणखी एक वाईट बातमी आलीये. आरबीआयने पेटीएमला नवीन ग्राहकांची नोंद करण्यास बंदी घातलीये. तसेच ऑडिट करण्याचेही निर्देश दिलेत. पेटीएमवर मनी लॉन्ड्रिंग आणि केवायसी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण ताजे असतानाच स्वॉफ्ट बँकेचे प्रतिनिधि मनीष वर्मा यांनी कंपनीला रामराम ठोकलाय. या सर्वच घटनांमुळे शेअरच्या दरात घसरण सुरूच आहे. मंगळवारी शेअरचे दर 584 रुपयांपर्यंत पोहचलेत. 17 तारखेला पेटीएमच्या शेअर्सचे दर 623 रुपयांपर्यंत होते. मात्र, गुंतवणुकदारांनी सध्या पेटीएमच्या शेअर्सपासून दूरच राहावं असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. दिवसेंदिवस वाढणारा तोटा आणि आरबीआयनं फटकारल्यानंतर पेटीएम शेअर्सच्या दरात घसरण झालीये. मार्गेन स्टॅनलीनेही रेटिंग कमी केलीये. पेटीएम आयपीओ मूल्याकंनाच्या सेबीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे सेबीने नवीन आयपीओ संदर्भात कडक नियम केले आहेत. त्यामुळे भविष्यात आयपीओ मध्ये पैसा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील.

संबंधित बातम्या

सावधान! Income Tax वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल तर पकडले जाल; आयकर अधिकारी ‘असा’ घेणार शोध

US Federal reserves च्या व्याज दरवाढीचा भारताला फायदा; रुपयाच्या मुल्यात सुधारणा

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.