महसूलात Paytm ची तुफान घौडदौड, 25 टक्के नोंदवली वाढ, अनेक क्षेत्रात कामगिरी दमदार

Paytm FY 24 Revenue : पेटीएमने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मोठी घौडदौड केली. त्यानुसार कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल आता 9,978 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कसा आहे कंपनीची ग्रोथ रिपोर्ट?

महसूलात Paytm ची तुफान घौडदौड, 25 टक्के नोंदवली वाढ, अनेक क्षेत्रात कामगिरी दमदार
पेटीएमची जोरदार घौडदौड
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 12:52 PM

भारतीय युपीआयसह सेवा बाजारातील जु्ना खेळाडू पेटीएमने चमकदार कामगिरी दाखवली. कंपनीने महसूलात मोठी घौडदौड केली. या फिनटेक कंपनीने आता विमा क्षेत्रासह इतर विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जोरदार कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली. कंपनीचा महसूल आता 9,978 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीची संपूर्ण वर्षाचा EBITDA पहिल्यांदाचा 559 कोटींच्या घरात पोहचला आहे. आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासूनचा हा आलेख आहे.

आता या क्षेत्रावर फोकस

  1. या आर्थिक वर्षात (FY 25) कंपनी विमा, वित्तीय सेवा आणि उत्पादनांवर भर देणार आहे. त्यासाठी वितरणाचे मजबूत जाळे विणण्यावर भर देण्यात येणार आहे.
  2. Paytm ने एआयच्या वापरावर भर दिला आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कार्यशैली सुधारणेसाठी त्याचा वापर करण्यात येईल, त्याजोगे वार्षिक 400-500 कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. कंपनीने मल्टी-बँक मॉडेलवर काम सुरु केले आहे. त्याआधारे दीर्घकालीन कमाईच्या संधी शोधण्यात येणार आहे. त्यावर काम करण्या येणार आहे.

आर्थिक वर्षाचा मांडला ठोकताळा

One97 Communication limited चा पेटीएम हा ब्रँड आहे. भारताच्या आर्थिक क्षेत्रातील ही मोठी कंपनी आहे. ही QR कोड, साऊंडबॉक्स आणि मोबाईल पेमेंटमधील सर्वात आघाडीची कंपनी आहे. कंपनीने नुकताच आर्थिक वर्ष 2024 मधील चौथ्या तिमाहीतील निकाल घोषीत केला आहे.

या आर्थिक वर्षात (FY24) कंपनीने या क्षेत्रात कमाल कामगिरी करुन दाखवली. कंपनीने भरीव वाढ दर्शविली. कंपनीने कोट्यवधी पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये भरीव कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर या वाढीमुळे महसूलाचा आकडा आता 9,978 कोटींच्या घरात पोहचला आहे.

जीएमव्ही वाढ, इतर सेवांमधील दमदार कामगिरी यामुळे कंपनीने मोठे लक्ष गाठले. महसूलात आघाडी घेतली. कंपनीची संपूर्ण वर्षाचा EBITDA पहिल्यांदाचा 559 कोटींच्या घरात पोहचला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तो 734 कोटींच्या घरात होता. आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासूनची ही घौडदौड आहे. तर युपीआय इन्सेंटिव्हमध्ये 288 कोटींची भर पडली आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 182 कोटी रुपये होता. या घौडदौडीमुळे महसूलातील तोटा पण कमी झाला आहे.

कंपनीचे नफ्यातील योगदानात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 टक्के नफा झाला, हा आकडा 5,538 कोटी रुपयांवर पोहचला. वित्तीय सेवांच्या माध्यमांतून हा आकडा गाठता आला. कंपनीचा पेमेंट सेवेचा महसूल 26 टक्क्यांनी वाढला. तो वार्षिक आधारावर या आर्थिक वर्षात 6,235 कोटींच्या घरात पोहचला. तर या चौथ्या तिमाहीत त्यात 7 टक्के वार्षिक आधारावर वाढ होऊन हा आकडा 1,568 कोटींच्या घरात पोहचला. तर कर्ज वितरण मूल्य 48 टक्क्यांच्या घरात पोहचले. या आर्थिक वर्षात कर्ज वितरणाचा आकडा 52,390 कोटींच्या घरात पोहचले आहे.

कंपनीचे एकूण व्यापारी मूल्य (Gross merchandise Value) 39 टक्क्यांनी वाढले आहे. या आर्थिक वर्षात हा आकडा 18.3 लाख कोटींच्या घरात पोहचला. पेमेंट सेवेच्या माध्यमातून कमाईवर लक्ष केंद्रीत केल्याचे हे फळ म्हणता येईल. तर सब्सक्रिप्शन महसूलात मोठी वाढ झाली आहे. 1.07 कोटी व्यापाऱ्यांच्या देवाण-घेवाणीतून मार्च 2024 मध्ये ही वाढ नोंदवली. ही वाढ 58 टक्के इतकी नोंदवली गेली. मार्च 2023 मध्ये वार्षिक आधारावर 68 लाख असा आकडा होता.

कमी वेळात जोरदार आघाडी “मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही इतर सहयोगी बँक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आमचा एकत्रित पेमेंट व्यवसायात भरारी घेतली. आमच्या व्यवसायावरील मळभ त्यामुळे हटले आणि नवीन संधी आम्हाला मिळाली. ग्राहक आणि व्यावसायिक उलाढालीला त्यामुळे मजबुती आली. इतक्या कमी वेळेत हे घडले याचा खूप मोठा आनंद आहे. तर यावेळी बाजार नियंत्रकांनी सुद्धा आम्हाला मोलाची साथ दिली. एनपीसीआय, सहयोगी बँक आणि आमची सहकारी टीम यांच्यामुळे हे साध्य झाले. सरकार, नियंत्रक संस्था आणि वित्तीय सेवांचा समावेश यांच्यामुळे दीर्घकालीन वाढीची आम्हाला मोठी संधी प्राप्त झाली.” असे पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

काय आहेत ठळक मुद्दे

क्रेडिट वितरणावर दिला भर

या आर्थिक वर्षात पेटीएमने केवळ क्रेडिट वितरणावर अधिक भर दिला. वितरणातही त्यांचे लक्ष क्रेडिट वितरण मॉडेलवर होते. बँका, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञानाची मदत यांच्या सहाय्याने कंपनीने मोठी भरारी घेतली. त्याआधारे कंपनीने कर्ज वितरणावर लक्ष केंद्रीत केले.

विमा आणि वित्तीय सेवा-उत्पादनांवर लक्ष

कंपनीने आता आर्थिक वर्ष 2025 साठी त्यांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. त्यानुसार कंपनी विमा, वित्तीय सेवा आणि उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. उभारत्या विमा क्षेत्रातील संधी पाहता कंपनीने एक आरोग्य विमा उत्पादन बाजारात उतरविण्यावर भर दिला आहे. हा आरोग्य विमा कॅशलेश उपचार देईल. त्यात मासिक हप्त्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्रासविरहित आणि सहज दावा करण्याची सुविधा यामध्ये असेल. कंपनी ऑटो, शॉप, आरोग्य आणि जीवन विमा क्षेत्रात पाय रोवणार आहे.

AI तंत्रज्ञानाचा करणार वापर

Paytm ने एआयच्या वापरावर भर दिला आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कार्यशैली सुधारणेसाठी त्याचा वापर करण्यात येईल, त्याजोगे वार्षिक 400-500 कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युझरचा या प्लॅटफॉर्मवरील वावर पण वाढला आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सरासरी मासिक उलाढालीत 7 टक्क्यांची वाढ झाली असून वार्षिक आधारावर हा आकडा 9.6 कोटींच्या घरात पोहचला आहे.

कंपनीच्या मेट्रिक्समध्ये तात्पुरता व्यत्यय दिसत असला तरी आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीत ग्राहक आणि व्यापारी यांचा आधार असलेल्या मेट्रिक प्रणालीत स्थिरता दिसून येईल असा कंपनीचा दावा आहे. कंपनी डिजिटल पेमेंट उत्पादनाव्यतिरिक्त इतर सेवांमध्ये आगेकूच करत आहे, हे एप्रिल महिन्यातील दरवाढीच्या कलावरुन स्पष्ट होते आहे.

पेटीएम आता TDAP

  • पेटीएम आता विस्तारली आहे. कंपनीने थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हाडर (TDAP) म्हणून सेवा सुरु केली आहे. युपीआय चॅनल आणि एनपीसीआयच्या मदतीने कंपनीची घौडदौड सुरु आहे. कंपनी ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेच्या मदतीने युपीआय युझर्सला सहज आणि सोप्यारित्या युपीआय पेमेंट सेवा देत आहे.
  • ॲक्सिस बँकेकडे नोडल खाते आहे. तर एसक्रो खाते ही सुरळीतपण सुरु आहे. नवीन युपीआय व्यवहारासाठी येस बँकेची मदत होत आहे. इतर सेवा-सुविधा जशा की नोडल, एसक्रो, बीआयचे कार्यपण सुरळीत सुरु आहे. हे सर्व सेवांचे स्थलांतरण अगदी सहज झाले आहे. विविध बँकांच्या सहकाऱ्याने पेटीएम त्याची व्यवसाय वृद्धी करत आहे आणि नवनवीन व्यावसायिक वृद्धीच्या संधी शोधत आहे.
  • पेटीएमकडे रोखीत व्यवहारासाठी मार्च 2024 अखेर 8,650 कोटी रुपये शिल्लक होती. आर्थिक आरोग्यासाठी ही ठेव उपयोगी ठरली आहरे. यामध्ये पेटीएम मनीचा ग्राहक निधी डिसेंबर 2023 मध्ये 462 कोटी तर मार्च 2024 मध्ये 339 कोटी रुपये इतका होता. त्यात अजून 375 कोटींच्या रोखीची भर पडली आहे, जी की युपीआय इन्सेटिव्ही व्यतिरिक्त आहे.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.