Penny Stock : 1 रुपयाच्या शेअरची कमाल!  गुंतवणूकदार मालामाल

Penny Stock : गेल्या आठवड्यात शेअर बाजार 3043 अंकांनी घसरला आहे. पण या काळात काही छोट्या शेअरने कमाल केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना एकदम मालामाल केले आहे. पडत्या बाजारात या शेअरने त्याचा दम दाखवला आहे.

Penny Stock : 1 रुपयाच्या शेअरची कमाल!  गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 8:01 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाात (Share Market) प्रचंड चढउतार होत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. दिग्गज प्लेअर्स धराशायी होत आहे. दिग्गज कंपन्यांचे पानिपत होत असल्याने गुंतवणूकदारही शांत झाले आहेत. गुंतवणूकदारांचे (Investors) गेल्या महिनाभरापासून प्रचंड नुकसान झाले आहेत. त्यातच अमेरिका आणि युरोपातून धडकणाऱ्या बातम्यांनी बाजाराची चिंता वाढवली आहे. पण या काळात काही छोट्या कंपन्यांनी कमाल दाखवली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजार 3043 अंकांनी घसरला आहे. पण या काळात काही पेन्नी शेअरने (Penny Share) कमाल केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना एकदम मालामाल केले आहे. पडत्या बाजारात या शेअरने त्याचा दम दाखवला आहे.

शेखावती पॉली यार्न लिमिटेड असे या पेन्नी शेअरचे नाव आहे. हा शेअर एका आठवड्यात 30 टक्के वधारला आहे. हा शेअर अत्यंत कमी किंमतीला घेता येईल. सोमवारी या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांचिी वाढ झाली. हा शेअर 65 पैशांवर बंद झाला. या शेअरने पडत्या बाजारात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. गेल्या वर्षभरात हा शेअर सातत्याने घसरणीवर असला तरी महिन्याभरात त्याच्यात चांगली तेजी दिसून येत आहे.

शेखावती पॉली यार्न या शेअरने 52 आठवड्यात 1.05 रुपयांचा उच्चांक गाठला तर या शेअरचा निच्चांक 0.45 रुपये आहे. 20 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत हा शेअर 50 पैसे होता. या शेअरमध्ये सध्या 30 टक्क्यांची तेजी नोंदविण्यात आली. हा शेअर 65 पैशांवर पोहचला. या पेन्नी स्टॉकने गेल्या 6 महिन्यात 23.53 टक्क्यांचे नुकसान केले आहे. तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांचा फटका दिला आहे. सुरुवातीपासून विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांना 78 टक्क्यांचा झटका दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पेन्नी शेअर जोखीम मोठी

भारतीय शेअर बाजारात 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरला पेन्नी स्टॉक म्हणतात. पेन्नी स्टॉक्स खरेदी करणे अत्यंत धोकादायक, जोखीमेचा व्यवहार मानल्या जातो. पण हे स्टॉक झटपट मोठा परतावा देण्यात अग्रेसर असतात. ते एखाद्या लॉटरी पेक्षा कमी नाहीत. पण परतावा जोरदार मिळतो म्हणून या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे योग्य नाही. कंपनीची माहिती. कंपनीचा पोर्टफोलिओ, कर्ज, तिची कामगिरी, तिचे भविष्यातील प्रकल्प, रेशो, नफ्याचे गणित, बाजारातील इतर ठोकताळे यावर ही कंपनी किती खरी उतरते, याचा विचार करुन पेन्नी शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी. अभ्यास करावी. डोळे झाकून गुंतवणूक करु नये. बाजारातील तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय पेन्नी शेअरमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे ठरु शकते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.