या छोटुरामने केली कमाल, किंमतीत आले 300 टक्के तुफान, गुंतवणूकदार झाले मालामाल

| Updated on: Aug 01, 2024 | 4:20 PM

Penny Stock : जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार आहे. हा पेनी स्टॉक सातत्याने जोरदार रिटर्न देत आहे. या स्टॉकमध्ये 300 टक्क्यांची तेजी आली आहे. गुंतवणूकदारांचे या घडामोडींवर बारीक लक्ष आहे.

या छोटुरामने केली कमाल, किंमतीत आले 300 टक्के तुफान, गुंतवणूकदार झाले मालामाल
शेअर बाजार, पेनी शेअर
Follow us on

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या काही दिवसांपासून तुफान तेजीत आहे. हा पेनी शेअर सातत्याने रिटर्न देत आहे. आज गुरुवारी या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. हा शेअर 2.93 रुपये इंट्रा डे उच्चांकावर पोहचला आहे. कंपनीचा शेअर YTD मध्ये आतापर्यंत 105 टक्क्यांची उसळी आली आहे. या दरम्यान त्याची किंमत 75 पैशावरुन दोन रुपयांच्या घरात पोहचली. भारतीय जीवन विमा कंपनी, एलआयसीचे या पेनी स्टॉकमध्ये 3.33 टक्के वाटा आहे. एलआयसीकडे 42,61,77,058 शेअर आहे. एलआयसीची नाही तर अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

वर्षभरात मोठा परतावा

बाजारात या पेनी स्टॉकने 6 जूनपासून आतापर्यंत जवळपास 100 टक्के परतावा दिला. 6 जून रोजी बीएसईवर हा शेअर 1.49 रुपयांवर होता. 7 जूनपासून या शेअरमध्ये रॅली दिसली. बीएसई विश्लेषणनुसार, या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये 44 टक्क्यांची आणि या वर्षात आतापर्यंत 103 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. वर्षभरात या पेनी शेअरमध्ये 270 टक्क्यांची तेजी दिसली. गेल्या 5 वर्षांत 330 टक्क्यांचा रिटर्न दिला. या कंपनीचा मार्केट कॅप 3,534.81 कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक 4.35 रुपये आणि 52 आठवड्यातील निच्चांक 0.70 पैसे आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी काय करते

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर ही वायरलेस टेलिकॉम ऑपरेटरच्या टॉवरचे आणि इतर व्यवस्थापन करते. कंपनीकडे भारतात 22 टेलिकॉम सर्कलमध्ये जवळपास 26,000 टॉवरचे व्यवस्थापनाचे काम आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार आहे. हा पेनी स्टॉक सातत्याने जोरदार रिटर्न देत आहे. या स्टॉकमध्ये 300 टक्क्यांची तेजी आली आहे. गुंतवणूकदारांचे या घडामोडींवर बारीक लक्ष आहे. कंपनीची घोडदौड जोरात आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.