अगदी खरंय! हा पेनी स्टॉक देणार मोफत शेअर, 3 रुपयांपेक्षा पण किंमत कमी, ही तारीख विसरू नका
Penny Stock Mayukh Dealtrade Ltd : प्रत्येक 5 शेअरवर ही कंपनी गुंतवणूकदारांना 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. सर्व शेअर 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे असतील. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड डेट 17 जानेवारी 2025 ही निश्चित केली आहे. या पेनी स्टॉकची किंमत 3 रुपयांपेक्षा पण कमी आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला पेनी स्टॉक मयूख डीलट्रेड लिमिटेडने (Mayukh Dealtrade Ltd) गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्षात मोठे गिफ्ट दिले आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअरवर ही कंपनी गुंतवणूकदारांना 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. सर्व शेअर 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे असतील. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड डेट 17 जानेवारी 2025 ही निश्चित केली आहे. या पेनी स्टॉकची किंमत 3 रुपयांपेक्षा पण कमी आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर देईल.
कंपनीने प्रत्येक 5 शेअरवर 3 बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. हे सर्व शेअर 1 रुपयांच्या फेसव्हॅल्यूचे असतील. कंपनीने बोनस शेयरसाठी रेकॉर्ड डेट 17 जानेवारी 2025 ही निश्चित केली आहे. कंपनीने याविषयीची माहिती बाजाराला दिली आहे. फाईलिंगनुसार, कंपनीने 31 डिसेंबर 2024 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर देण्यास मंजूरी दिली आहे.
मयूख डीलट्रेड लिमिटेड ही कंपनी मुख्यत्वेः पोर्टफोलिओ मॅनेजमेंट व्यवसायात सक्रिय आहे. कंपनीने यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये शेअरची फेसव्हॅल्यू 5 रुपयांनी कमी करून 1 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी कंपनीने शेअर 2:1 प्रमाणात स्प्लिट केला होता.
बोनस शेअरमध्ये कंपन्या त्यांच्या शेअरधारकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता अतिरिक्त शेअर वाटप करतात. त्याचा परिणाम कंपनीच्या बाजारातील मूल्यांकनावर होत नाही. तर बोनस शेअरची किंमत बोनसच्या प्रमाणात बदलते. यामध्ये गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभ मिळतो. तर शेअर बाजारात तरलता वाढते.
सर्वात महागडा स्टॉक
एल्सिड इन्वेस्टमेंट्सने 29 ऑक्टोबर रोजी जवळपास 67 हजार टक्क्यांची अचानक उसळी घेतली. कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात 3.53 रुपयांहून वधारून 2,36,250 रुपयांवर पोहचला. सध्या हा स्टॉक 1,82,999.40 रुपयांवर आहे. या नवीन अपडेटमुळे एल्सिड इन्वहेस्टमेंटचा शेअर भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरला आहे. BSE आणि NSE वर आयोजित एका स्पेशल कॉल ऑक्शनमुळे ही तेजी आल्याचे दिसून आले.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.