Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stocks : पेनी शेअरवर लावला का डाव, की चुकली संधी

Penny Stocks : शेअर बाजारात गुंतवणूकदार चांगल्या शेअरच्या शोधात असतात. काही जण स्वस्तातील शेअरच्या मागे असतात. चांगल्या पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करुन ते मोकळे होतात. शुक्रवारी या 10 कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. शुक्रवारी या शेअरमध्ये केवळ खरेदीची लाट आली होती. कोणते आहेत हे शेअर?

Penny Stocks : पेनी शेअरवर लावला का डाव, की चुकली संधी
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 6:45 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (RBI MPC) बैठकीतील निर्णय शेअर बाजाराच्या पथ्यावर पडले. शुक्रवारी या बैठकीतील निर्णयाची उजळणी करण्यात आली होती. सलग चौथ्यांदा केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक क्षेत्रांनी सुस्कारा सोडला. भारतीय शेअर बाजारावर शुक्रवारी त्याचा परिणाम दिसून आला. सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सने 362 अंकांची चढाई केली. तर निफ्टी 19,651 अंकावर बंद झाला. काही कंपन्यांनी घौडदोड केली तर काही कंपन्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. पण एक विशेष घडामोड घडली. या 10 पेनी शेअरमध्ये (Penny Share) मोठी तेजी दिसली. या शेअर्समध्ये केवळ खरेदीचेच सत्र सुरु होते. कोणते आहेत हे स्टॉक?

शुक्रवारी बाजारात तेजीचे सत्र

या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारात चैतन्य पसरले होते. BSE Sensex 364.06 अंकांनी मजबूत झाला. हा निर्देशांक 65,995.63 स्तरावर बंद झाला. तर NSE Nifty 107.75 अंकावर बंद झाला. 19,653.50 अंकावर बाजार बंद झाला. दोन्ही सेन्सेक्स तेजीत होते. सेन्सेक्समधील 23 शेअर हिरव्या रंगात न्हाऊन निघाले तर 7 शेअरमध्ये घसरण दिसली.

हे सुद्धा वाचा

हे सेक्टर तेजीत आले

आरबीआयने रेपो दर 6.50% वर स्थिर ठेवला. त्याचा परिणाम 13 प्रमुख क्षेत्रीय सूचकांकावर दिसून आला. त्यामध्ये तेजी दिसून आली. यामध्ये रिअल्टी, ऑटो आणि वित्तीय सेक्टरमधील शेअरमध्ये 0.35% आणि 1% यादरम्यान वृद्धी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये क्रमशः 0.4% आणि 0.7% तेजी दिसून आली. 6 ऑक्टोबर रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1986 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. शुक्रवारी व्यापारी सत्रात 256 शेअर्सनी 52 आठवड्यांचा स्तर गाठला. तर 22 शेअरनी 52 आठवड्यांचा निच्चांक गाठला.

या शेअरवर पडल्या उड्या

  1. Polymechplast Machines Ltd च्या शेअरमध्ये 20% टक्के तेजी आली.
  2. Transchem Ltd च्या शेअरमध्ये 20% तेजी दिसून आली.
  3. Xtglobal Infotech Ltd च्या शेअरने 19.98 टक्क्यांची उसळी घेतली
  4. Krishna Ventures Ltd च्या शेअर मध्ये 9.99 टक्क्यांची तेजी दिसून आली
  5. Lime Chemicals Ltd च्या शेअरने 9.98% तेजी नोंदवली
  6. Tarini International Ltd चा स्टॉकने 9.9 टक्क्यांची चढाई केली
  7. Oil Country Tubular Ltd च्या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांची वृद्धी दिसून आली
  8. Jet Airways (India) Ltd चा शेअर 4.99% वधारला
  9. Karma Energy Ltd चा शेअर 4.99% तेजीसह बंद झाला
  10. Captain Pipes Ltd च्या शेअरने 4.99 टक्क्यांची झेप घेतली
  11. Jonjua Overseas Ltd च्या शेअरने 4.99 टक्क्यांची उसळी घेतली

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?.