नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (RBI MPC) बैठकीतील निर्णय शेअर बाजाराच्या पथ्यावर पडले. शुक्रवारी या बैठकीतील निर्णयाची उजळणी करण्यात आली होती. सलग चौथ्यांदा केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक क्षेत्रांनी सुस्कारा सोडला. भारतीय शेअर बाजारावर शुक्रवारी त्याचा परिणाम दिसून आला. सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सने 362 अंकांची चढाई केली. तर निफ्टी 19,651 अंकावर बंद झाला. काही कंपन्यांनी घौडदोड केली तर काही कंपन्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. पण एक विशेष घडामोड घडली. या 10 पेनी शेअरमध्ये (Penny Share) मोठी तेजी दिसली. या शेअर्समध्ये केवळ खरेदीचेच सत्र सुरु होते. कोणते आहेत हे स्टॉक?
शुक्रवारी बाजारात तेजीचे सत्र
या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारात चैतन्य पसरले होते. BSE Sensex 364.06 अंकांनी मजबूत झाला. हा निर्देशांक 65,995.63 स्तरावर बंद झाला. तर NSE Nifty 107.75 अंकावर बंद झाला. 19,653.50 अंकावर बाजार बंद झाला. दोन्ही सेन्सेक्स तेजीत होते. सेन्सेक्समधील 23 शेअर हिरव्या रंगात न्हाऊन निघाले तर 7 शेअरमध्ये घसरण दिसली.
हे सेक्टर तेजीत आले
आरबीआयने रेपो दर 6.50% वर स्थिर ठेवला. त्याचा परिणाम 13 प्रमुख क्षेत्रीय सूचकांकावर दिसून आला. त्यामध्ये तेजी दिसून आली. यामध्ये रिअल्टी, ऑटो आणि वित्तीय सेक्टरमधील शेअरमध्ये 0.35% आणि 1% यादरम्यान वृद्धी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये क्रमशः 0.4% आणि 0.7% तेजी दिसून आली. 6 ऑक्टोबर रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1986 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. शुक्रवारी व्यापारी सत्रात 256 शेअर्सनी 52 आठवड्यांचा स्तर गाठला. तर 22 शेअरनी 52 आठवड्यांचा निच्चांक गाठला.
या शेअरवर पडल्या उड्या
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.